esakal | संशयित आरोपीकडून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त! बार्शी पोलिस तीन आरोपींच्या मागावर
sakal

बोलून बातमी शोधा

संशयित आरोपीकडून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त!

मागील सहा महिन्यांत विविध घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यांत बार्शी तालुका पोलिस ठाण्याने एका संशयित आरोपीस अटक केली आहे.

Solapur : बार्शीत संशयित आरोपीकडून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त!

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : मागील सहा महिन्यांत विविध घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यांत बार्शी तालुका पोलिस ठाण्याने (Barshi Taluka Police Station) एका संशयित आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये नऊ गुन्हे (Crime) उघडकीस आले असून, त्याच्याकडून 24 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. माणिक गुलाब काळे (वय 30, रा. कासारखाणी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, गुन्ह्यातील तीन जण अद्याप फरार आहेत.

हेही वाचा: बार्शीत माजी नगरसेविकेचे भरदिवसा घर फोडले! 3 लाखांचा ऐवज लंपास

मोबाईल टॉवरवरील बॅटऱ्या, इलेक्‍ट्रिक पोलवरील तारा, मूग, उडीद पेरणी यंत्र, दहा टायरचा टिपर असा 24 लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. संशयित आरोपी 29 सप्टेंबर रोजी वाशी येथील बाजारपेठेत खरेदीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, पोलिस अभय उंदरे, अमोल माने, धनंजय फत्तेपुरे, रतन जाधव, राजेंद्र मंगरुळे, तानाजी धिमधिमे, बळिराम बेदरे यांचे पथक तयार करण्यात आले होते. पथकाने काळे यास ताब्यात घेऊन माहिती घेतली असता त्याच्यासह तिघांनी गुन्हा केला असल्याचे उघडकीस आले असून, बार्शी येथील आठ व ढोकी (ता. जि. उस्मानाबाद) येथील एक, असे नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

चोरीच्या प्रकरणातील अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथकाची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनाही लवकरच जेरबंद करू. इतर चोऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे का, याबाबत चौकशी सुरू आहे.

- शिवाजी जायपत्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, बार्शी तालुका पोलिस ठाणे

हेही वाचा: MPSC ची ना वाढली वयोमर्यादा ना निघाली 15 हजारांची भरती !

तालुका पोलिस ठाणे शहरात सुरू करावे

बार्शी तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत 59 गावे असून, रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी चोरणे, पशुधन पळवून नेणे, शेतामध्ये सर्वजण कामाला गेले असताना दिवसा घरफोडी करणे, धान्य चोरी करणे, वस्तीवरील वाहने चोरणे असे अनेक गुन्हे घडले आहेत. शहरापासून तालुका पोलिस ठाणे पाच किलोमीटर लांब आहे. ग्रामीण भागात कोठेही गुन्हा घडला तरी नागरिकांना शहरात येऊन पोलिस ठाण्यात जावे लागत आहे. रात्री- अपरात्रीची वेळ असताना तर ग्रामीण भागातील नागरिकांना वाहनांची सोय उपलब्ध होत नसून, तालुका पोलिस ठाणे शहरात सुरू करावे, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांमधून होत आहे.

loading image
go to top