बार्शी तालुक्‍यात कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला दिड हजाराचा आकडा 

corona treatment.jpg
corona treatment.jpg
Updated on

बार्शी(सोलापूर) ः बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यातील कोरोना संसर्गाचे प्राप्त झालेल्या दोन दिवसांच्या 391 तपासणी अहवालामध्ये 65 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.शहरातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून बाधितांची एकूण संख्या 1 हजार 560 झाली आहे.अशी माहिती तहसीलदार डी.बी.कुंभार यांनी दिली. 

शहरातील 322 व ग्रामीण मधील 34 अहवाल असे 356 अहवाल प्राप्त झाले.यामध्ये शहरातील 31 व ग्रामीण मधील 34 असे 65 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.शहरातील 29 तर ग्रामीण मधील 26 अशा 55 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

शहरातील 291 व ग्रामीण मधील 35 असे 326 जण निगेटिव्ह आढळले आहेत.शहरात 907 तर ग्रामीणमध्ये 653 असे एकूण 1 हजार 560 जण कोरोनाबाधित आहेत. 
शहरातील पंकज नगर 1,दत्तनगर 3,बाशिंगे प्लॉट 1,धर्माधिकारी प्लॉट 1,नवी चाटे गल्ली 2,सोलापूर रोड 1,गाडेगाव रोड 4,बार्शी गावठाण 2,सुभाषनगर 2,गुंड प्लॉट,आडवा रस्ता,भोगेश्वर मंदिरजवळ,गोंधिल प्लॉट,सनगर गल्ली,परंडा रोड,रिंग रोड येथे प्रत्येकी एक जण,अलिपूर रोड 2,कोर्ट मागे 3,असे 31 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 
ग्रामीण भागातील वैराग 7,श्रीपतपिंपरी 2,राळेरास 1 नारी 1,कव्हे 2,कोरफळे 14,धामणगाव 2,खामगाव 3,चारे 1,शेलगाव 1,असे 34 जण नविन कोरोनाबाधित आढळले आहेत. 
शहरातील 253 व ग्रामीण भागातील 138अशा 391 जणांवर उपचार सुरु आहेत.तर आत्तापर्यंत 1 हजार 114 जण उपचार होऊन बरे होऊन गेले आहेत.यामध्ये शहरातील 625 तर ग्रामीण भागातील 489 जण आहेत. सर्दी,खोकला येत असलेले शहरात 28 रुग्ण असून ग्रामीण भागात 6 जण आढळले आहेत.48 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती कुंभार यांनी दिली.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com