

Barshi police arrested the brother and two relatives accused of murdering a youth after a drunken altercation.
Sakal
टेंभुर्णी : माढा तालुक्यातील रांझणी भीमानगर हद्दीत अज्ञात कारणावरून एका अनोळखी तरुणाचा खून झाला होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहास दगड बांधून उजनी कालव्यामध्ये टाकल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली होती. यातील मृत तरुणाची ओळख पटविण्यात व खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी मृत तरुणाच्या सख्खा भाऊ व त्याच्या दोन नातेवाइकांना अटक केली आहे. दारू पिऊन कुटुंबातील व बाहेरील लोकांना त्रास देत असल्याने तरुणाचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.