सोलापूरात एसटी कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

प्रजासत्ताक दिनी विभाग नियंत्रकांसमोर पुन्हा मागितली दाद
ST Bus
ST Bus esakal
Updated on

सोलापूर : एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी गेल्या ८० दिवसांपासून संप पुकारला आहे. परंतु, या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने प्रजासत्ताक दिनी संपकरी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत विभाग नियंत्रक विलास राठोड यांच्यासमोर भीक मांगो आंदोलन केले.

ST Bus
अहमदनगर : कोरोनाचे दिवसभरात नवे एक हजार २७३ रुग्ण

सोलापुरात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर हे ‘भीक मांगो’ आंदोलन केले. यातून जमा झालेली रक्कम राज्य सरकारला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ८० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. परंतु, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यामुळे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर एसटी आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी आंदोलन केले.

ST Bus
अमेझॉनच्या माध्यमातून राज्यातील आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्याना मिळणार टॅब

महिला कर्मचारीही होत्या सहभागी

एसटीच्या विभागीय कार्यालयापासून एसटी स्टॅंडपर्यंत भीक मागून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांनी दुकानदार, पादचारी, वाहनधारक अशा सर्वांकडे भीक मागितली. या आंदोलनात महिला कर्मचारीदेखील सहभागी झाले होते. यातून जमा झालेली रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com