
करमाळा : दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सूर्यकांत पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला.