

BJP Leader Pratapsingh karche Murder Case
ESakal
सांगोला : सांगोला तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह करचे यांचा डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. शिंदेसेनेच्या नेत्यावर हत्या घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.