

Maharashtra Vidhan Parishad election results BJP victory
sakal
सोलापूर: राजकारणाच्या फुटबॉल मैदानावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा वर्चस्व सिद्ध करत सलग चौथा गोल नोंदविला आहे. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील विजयांची मालिका कायम राखत त्यांनी विधान परिषद निवडणुकीत राजेंद्र राऊत यांना विजयी करून मोहिते-पाटील गटाच्या आव्हानावर मात केली. मोहिते-पाटील यांच्या 'अदृश्य शक्ती'चा बचाव भेदत भाजपने दणदणीत विजय मिळविला. जिल्ह्याच्या राजकारणात गोरे यांचे वाढते वर्चस्व अधोरेखित झाले असून, त्यांच्या विजयाच्या मालिकेतील हा सलग चौथा गोल ठरला आहे.