esakal | इथे नांदतो जिव्हाळा अन्‌ माणुसकी... आजही "येथील' एकाच वाड्यात राहतात 16 कुटुंबे अन्‌ 80 लोक! 
sakal

बोलून बातमी शोधा

Wada

उपळाई बुद्रूक येथील बोकडदरवाडी येथे 1964 मध्ये (कै.) नारायण आप्पा वाकडे यांनी एक एकर क्षेत्रात भला मोठा किल्ल्यासारखा तटबंदी असलेला वाडा बांधला आहे. आज या वाड्यात 16 पेक्षा जास्त कुटुंबांचे 70 ते 80 नागरिक येथे राहात आहेत. एकीकडे फ्लॅट संस्कृतीमुळे कुटुंब विभक्तीकरण वाढत असताना, वाडा व त्यातील जीवन इतिहासजमा होत असताना एकाच घराण्यातील 16 कुटुंबे एकाच तटबंदी असलेल्या वाड्यात राहणे म्हणजे सध्या दुर्मिळच बाब आहे. या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे, आतमध्ये 21 घरे असून त्यात 16 कुटुंबे राहात आहेत. सध्या पाचवी पिढी येथे वास्तव्यास आहे.

इथे नांदतो जिव्हाळा अन्‌ माणुसकी... आजही "येथील' एकाच वाड्यात राहतात 16 कुटुंबे अन्‌ 80 लोक! 

sakal_logo
By
अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : "गुजरा हुआ जमाना आता नहीं दोबारा...' असे म्हणत वाडा संस्कृतीच्या वातावरणातून आधुनिक, स्वयंपूर्ण घरामध्ये गेलेले लोक वाड्याचे जुने दिवस आठवून आजही हळवे होतात. बदलत्या काळाच्या नवसंकल्पनेनुसार व आर्थिक स्तर उंचावल्याने वाडा इतिहासजमा होऊन ग्रामीण भागात फ्लॅट संस्कृती वेगाने वाढत आहे. या बदलत्या काळात फ्लॅट संस्कृती आली असली तरी वाडा आणि त्यातील माणुसकी, जिव्हाळा आजही माढा तालुक्‍यातील बोकडदरवाडी येथील नागरिकांनी जपला असून, जवळपास एक एकरच्या वाड्यात आज देखील जवळपास 16 कुटुंबातील 80 जण गुण्यागोविंदाने एकत्रित राहात आहेत. 

हेही वाचा : मोठी बातमी! "या' दिवशी सुरू होणार महाविद्यालये; अकरावीचे सर्वच प्रवेश होणार ऑनलाइन, 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण होणार प्रवेश प्रक्रिया 

उपळाई बुद्रूक येथील बोकडदरवाडी येथे 1964 मध्ये (कै.) नारायण आप्पा वाकडे यांनी एक एकर क्षेत्रात भला मोठा किल्ल्यासारखा तटबंदी असलेला वाडा बांधला आहे. आज या वाड्यात 16 पेक्षा जास्त कुटुंबांचे 70 ते 80 नागरिक येथे राहात आहेत. एकीकडे फ्लॅट संस्कृतीमुळे कुटुंब विभक्तीकरण वाढत असताना, वाडा व त्यातील जीवन इतिहासजमा होत असताना एकाच घराण्यातील 16 कुटुंबे एकाच तटबंदी असलेल्या वाड्यात राहणे म्हणजे सध्या दुर्मिळच बाब आहे. या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे, आतमध्ये 21 घरे असून त्यात 16 कुटुंबे राहात आहेत. सध्या पाचवी पिढी येथे वास्तव्यास आहे. एकीकडे नागरिक कुटुंबातून वेगळे होऊन दुसरीकडे राहणे पसंत करत असताना, बोकडदरवाडी (उपळाई बुद्रूक) येथील वाकडे कुटुंबीय जुन्या रूढी-परंपरा सांभाळत पूर्वजांनी बांधलेल्या या वास्तूमध्ये राहात सर्वसण उत्सव एकत्रितपणे साजरा करत आहेत. सध्या ग्रामीण भागात क्वचित कुठे तरी एखादे कुटुंब वाड्यात राहायला दिसते. सर्रास वाडे पडलेले दिसून येतात. अशा या बदलत्या काळात देखील वाकडे कुटुंबीयांनी जपलेली वाडा व त्यातील संस्कृती ही कौतुकास्पद अशीच आहे. 

हेही वाचा : पंढरपुरातून उद्या महायुतीच्या दूध आंदोलनाचा एल्गार ! 

या वाड्यास यांनी दिल्या भेटी 
माजी आमदार बाबूराव पाटील, माजी आमदार गणपतराव साठे, माजी आमदार विनायकराव पाटील यांनी या वाड्यास भेटी दिल्या आहेत. 

या वाडा संस्कृतीबद्दल जे. जे. रुग्णालय, मुंबईचे फिजिशियन डॉ. विश्‍वजित वाकडे म्हणाले, शिक्षणानिमित्त अथवा नोकरीच्या निमित्ताने आम्ही काहीजण बाहेरगावी जरी असलो तरी आमच्या खूप आठवणी त्या वाड्यात असल्याने आम्हाला त्या वाड्याची ओढ लागलेली असते. या वाड्यामुळेच आमच्यात अजूनही एकत्र कुटुंब पद्धत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top