
सोलापूर : शहरातील ६७ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट (सीए) यांना एकेदिवशी व्हॉट्सॲपवर लिंक आली. त्या लिंकवर त्यांनी क्लिक केले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेल्यांचे अनुभव त्याठिकाणी पाहायला मिळाले. त्यातून त्यांनी सुरवातीला एक लाख रुपये गुंतवले. सायबर गुन्हेगारांनी त्यांना चार-पाच दिवसांत २५ हजार रुपयांचा परतावा दिला. त्यानंतर ‘सीए’नी दीड महिन्यात दोन कोटी २८ लाख रुपये गुंतवले, पण त्यांना एक रुपयाही परत मिळाला नाही.