

Waterlogged sugarcane fields in rural Maharashtra — harvesting delayed as workers demand additional pay.
Sakal
कुर्डू: जिल्ह्यात साखर कारखाने सुरू झाले असले, तरी जमिनीत अद्याप ओल असल्याने प्रत्यक्ष ऊसतोडणी लांबणीवर पडत आहे. ऊसतोड टोळ्या गावात आली तरी प्रत्यक्ष तोडणीला सुरवात होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत टोळीच्या मुकदमाकडून फड सुरू करण्यासाठी पैशांची मागणी सुरू असल्याने आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.