

Solapur Civil Hospital to be upgraded with Super Speciality facilities; proposal sought by Central Government from Government Medical College.
Sakal
प्रकाश सनपूरकर
सोलापूर : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मागवला आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या अंतर्गत यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.