

Solapur Crime
Sakal
सोलापूर : नवी पेठेतील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून दोघांनी चेक चोरून नेला. त्यात फेरफार करून चेकवरील रक्कम दुसऱ्याच्याच खात्यात वर्ग करून घेतली. हा प्रकार दोन महिन्यांनी उघड झाला असून या प्रकरणी दोघांवर फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.