"कोविडमधून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घ्या"

"कोविडमधून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घ्या"

Summary

सध्या देशात न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती आहे. अशावेळी सामाजिक कर्तव्य म्हणून प्लाझ्मा दान करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे.

द. सोलापूर (सोलापूर) : कोविडच्या (Covid) उपचारातील एक प्रमुख भाग म्हणजे कन्व्हलजंट प्लाझ्मा ट्रीटमेंट (Plasma treatment) आहे. प्लाझ्मादानासाठी कोविडमधून बरे झालेल्या नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन करीत सोलापुरात डॉ. हेडगेवार रक्तपेढीत (Dr. Hedgewar Blood Bank) कन्व्हलजंट प्लाझ्मा संकलनाचे आणि वितरणाचे कार्य सुरू असल्याची माहिती मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.शैलेश पटणे (Dr. Shailesh Patne) यांनी 'सकाळ' ला दिली. (Chief Medical Officer Dr. Shailesh Patne said that citizens need to come forward for plasma donation)

"कोविडमधून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घ्या"
"उजनी"चे पाणी पेटणार, शेटफळ गढे योजनेला सोलापूर-नगरचा विरोध

सध्या कोरोना (कोविड-19) या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातही कोरोना रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. या दुसऱ्या लाटेत उपचार घेऊन बरे होत असतानाच मृत्यूची आकडेवारी मोठी आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर उपचार करताना आॕक्सिजन, व्हेंटिलेटर, बेडची जशी कमतरता आहे तशीच कमतरता रक्तासह प्लाझ्माची सुध्दा भासत आहे. हे प्लाझ्मा संकलनाचे काम सर्वच रक्तपेढ्यातून होत नसल्याने त्याची कमतरता अधिक आहे. प्लाझ्मा संकलनासाठी आवश्यक साधने व शासन परवानगी काही मोजक्याच रक्तपेढींना असल्याने प्लाझ्माचा पुरवठा मर्यादीत आहे. त्याचा परिणाम उपचारावर होत आहे.

"कोविडमधून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घ्या"
लसीसाठी सोलापूर वेटिंगवरच ! लसीअभावी 339 केंद्रे बंद

ही गरज ओळखून सोलापूरच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीकडून एप्रिल 2020 पासूनच कन्व्हलजंट प्लाझ्मा उपलब्ध करून दिला जात आहे. आत्तापर्यंत एकूण 27 प्लाझ्मा डोनरकडून कन्व्हलजंट प्लाझ्मा संकलित करण्यात आला आहे. तर शासन नियमाप्रमाणे 200 एम.एल.च्या 44 पिशव्या गरजु रुग्णांना वितरित करण्यात आल्या आहेत. परंतु आजच्या परिस्थितीत मागणीच्या प्रमाणात प्लाझ्मा संकलन होत नसल्यामुळे गरजु रुग्णांना कन्व्हलजंट प्लाझ्मा पुरविण्यात अडचणी येत असल्याचे डॉ. पटणे यांनी सांगितले. ज्यांना कोविड-19 हा आजार होऊन गेला आहे, अशा दात्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा डोनेट केल्यास रुग्णांच्या उपचारात मोठी मदत होईल असेही डॉ. पटणे यांनी सांगितले.

सध्या देशात न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती आहे. अशावेळी सामाजिक कर्तव्य म्हणून प्लाझ्मा दान करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यामुळे कोविड-19 च्या या महामारीविरुध्द सुरू असलेल्या लढाईत आपले योगदान देण्यासाठी युवकांसह सामाजिक संस्थांनी सहभाग द्यावा असे डॉ. पटणे यांनी सांगितले.

"कोविडमधून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घ्या"
"चुकीचं काही घडल्यास मी सोलापूर जिल्ह्यासोबत ! "उजनी'तील एक थेंब पाणी इतरत्र वळवू देणार नाही'

एन.ए.बी.एच.मानांकीत एकमेव रक्तपेढी

सोलापुरात डॉ. हेडगेवार रक्तपेढी ही एन.ए.बी.एच.मानांकीत एकमेव रक्तपेढी आहे. रक्तपेढीस 2014 मध्येच हे मानांकन मिळाले आहे. 1990 पासून कार्यरत डॉ. हेडगेवार रक्तपेढीमध्ये 2002 पासून रक्तघटक प्रयोगशाळा कार्यरत आहे. 2006 पासून रक्तपेढीस विभागीय रक्तसंक्रमण केंद्र म्हणून मान्यता मिळाली. अफेरेसिसद्वारे प्लेटलेट, प्लाझ्मा आणि लालरक्तपेशी वेगळ्या करण्याची परवानगी अन्न व औषध प्रशासनाकडून 2010 मध्ये मिळाली. रक्तपेढीकडून थॅलेसेमियाग्रस्त सुमारे 100 बालकांना दरवर्षी सुमारे 600 पेक्षा अधिक रक्तपिशव्या विनामूल्य वितरित केल्या जातात.

कन्व्हलजंट प्लाझ्मादान करण्यासाठी पात्रता

प्लाझ्मा दात्याचे वय 18 ते 60 च्या मध्ये असावे. वजन 50 किलो किंवा त्यापेक्षा अधिक असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण 12.5 टक्क्यांपेक्षा अधिक असावे. आर.टी.पी.सी.आर. किंवा रॅपिड अॅण्टीजेन पध्दतीने केलेल्या चाचणीमध्ये कोविड झाल्याचा रिपोर्ट असावा. कोविडची बाधा झाल्यापासून 28 दिवस पूर्ण झालेले असावेत.

(Chief Medical Officer Dr. Shailesh Patne said that citizens need to come forward for plasma donation)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com