esakal | कोरोनाविरुद्ध बार्शीकरांची युनिटी ! सर्व कोरोना रुग्णांना देणार मोफत प्लाझ्मा, नाश्‍ता व जेवण

बोलून बातमी शोधा

Corona
कोरोनाविरुद्ध बार्शीकरांची युनिटी ! सर्व कोरोना रुग्णांना देणार मोफत प्लाझ्मा, नाश्‍ता व जेवण
sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : मागील वर्षी मार्चअखेरीस सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग पूर्ण वर्ष झाले तरी संपता संपेना! देशासह राज्यात विविध उपाययोजना राबवल्या जात असतानाही लॉकडाउनमध्ये सामान्यांना रुग्णालयांची बिले भरून अडचणीत येत आहेत, अनेकांचे रोजगार गेले आहेत. आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अशावेळी शहरातील आमदार, विविध संस्था, व्यापारी, दानशूर व्यक्ती यांनी एकत्र येऊन 1 मेपासून शहरातील सर्व रुग्णालयांतील रुग्णांना मोफत प्लाझ्मा, नाश्‍ता, दोन वेळचे जेवण, पाणी देण्याचे जाहीर करून बार्शीकरांनी कोरोनाशी दोन हात करून लढण्याचे ठरवले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 100 बेडच्या रुग्णालयासह सुमारे 700 कोरोना रुग्णांचा नाश्‍ता, जेवणाचा विषय मार्गी लावण्यात यश आले आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी बैठक घेऊन स्वतः पाच लाख रुपये देत सर्वांनी मदत करावी, असे आवाहन केले. याला मोठा प्रतिसाद मिळाला असून सुमारे 35 लाख रुपये काही तासांत जमा झाले आहेत.

हेही वाचा: बीपी, शुगर, लिव्हर, किडनीचा त्रास ! तरीही ऐंशी वर्षांच्या गुरुजींनी शिकवला कोरोनाला धडा

शहरातील सर्व हॉस्पिटल्स, कोव्हिड सेंटर, कोव्हिड केअर सेंटर येथील रुग्णांसाठी ही व्यवस्था रुग्णालयांपर्यंत पोच करण्यात येणार असल्याचे तसेच प्रत्येकाला मिनरल वॉटरही मोफत दिले जाणार असल्याचे आमदार राऊत यांनी या वेळी सांगितले. कोरोना संसर्गामुळे सर्वत्र रुग्णांची संख्या वाढत आहे.

रुग्णांवर उपचार कण्याच्या अनेक पद्धतींपैकी रक्तातील घटक प्लाझ्मा थेरेपी उपचार पद्धतीमुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे. यासाठी सुमारे आठ हजारांपर्यंत खर्च येतो. हे सर्वसामान्यांना परवडत नाही, असे लक्षात येताच भगवंत रक्तपेढीने गरजूंसाठी मोफत प्लाझ्मा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबवत असल्याची माहिती चेअरमन शशिकांत जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, रावसाहेब मनगिरे, नगरसेवक संदेश काकडे, संदीप बरडे, सुधीर राऊत, शकील मुलाणी, अश्‍फाक काझी, गणेश जगदाळे, मुकुंद यादव आदी उपस्थित होते.

हेही वाचा: सख्ख्या भावांसह तिघांना आजन्म कारावास ! टमटमच्या भाड्यातून केला खून

सामाजिक बांधिलकीतून मदत

शशिकांत जगदाळे म्हणाले, कोराना रुग्णांना सध्या प्लाझ्माची आवश्‍यकता आहे. पण अनेकजण आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. तसेच अनेकांचे रोजगारही गेले आहेत. बेकारीच्या संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मोफत कोव्हिड प्लाझ्मा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.