ऊस तोडणी कामगारांचे प्राधान्याने लसीकरण

जिल्हाधिकारी शंभरकर : माळशिरस तालुक्‍यातील लसीकरण केंद्रांना भेट
Corona Vaccination
Corona Vaccinationsakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यात उस गाळप हंगाम सुरु असल्याने विविध जिल्ह्यातून ऊस तोडणी कामगार सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ऊस तोडणी कामगारांचेही प्राधान्याने कोरोना लसीकरण करावे. त्यासाठी संबधित साखर कारखान्यांनी आवश्‍यक ते नियोजन करुन आरोग्य विभागाच्या मदतीने लसीकरण मोहीम राबवावी अशी सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे.

Corona Vaccination
Chopper Crash : चूक इथं झाली? लवकरच समोर येणार अहवाल

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आज माळशिरस तालुक्‍यातील विविध लसीकरण केंद्रांना भेट देऊन येथील लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. माळशिरस तालुक्‍यातील आनंदनगर येथील जिल्हा परिषद शाळा, चाकोरे, कोंडबावी, विजयवाडी येथील आरोग्य उपकेंद्रांना भेट देऊन शंभरकर यांनी लसीकरणाची माहिती जाणून घेतली. जावळे वस्ती, तरसे वस्ती येथे ऊस तोडणी सुरू असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून ऊस कामगारांच्या लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार जगदिश निंबाळकर, नायब तहसीलदार अशिष सानप, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. संकल्प जाधव यांच्यासह आरोग्य अधिकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. प्रशासनाने सर्वच पात्र व्यक्तींना लस घेणे बंधनकारक केले आहे. कोणताही पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजनातून काम करीत आहे. शहरासह ग्रामीण भागातील कोणताही पात्र व्यक्ती लसिकरणापासूण वंचित राहू नये याची दक्षता आरोग्य तसेच संबधित यंत्रणेने घ्यावी.

Corona Vaccination
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा तब्बल ४९ दिवसानंतर मृत्यू...

"जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी देशात व राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे. पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याची मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने एकही पात्र लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत."

- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The project is expected to improve irrigation, drinking water supply and water storage in Solapur, Satara and Pune districts.
The protesters warned of an agitation if their demands regarding smart meters and power supply issues are not addressed within eight days.
Protesters demanded an impartial inquiry into the NEET paper leak and the alleged police action on students while seeking accountability from the Union Education Minister.
Protesters submitted a memorandum demanding an impartial inquiry into the alleged police action against student protesters and action on their demands.
Marathi News Esakal
www.esakal.com