बांधकामाचे साहित्य महागले! सिमेंट आणि स्टीलच्या दरात वाढ

Construction materials
Construction materialsesakal
Summary

कोरोनापुर्वी मिळणारे बांधकामाचे साहित्यांची भाव वाढ झाल्याने घरबांधकामावर बोजा वाढला आहे.

सोलापूर: कोरोनाच्या काळात मागील वर्षभरात सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. यातून बांधकामाला लागणारे साहित्य देखील अपवाद नाही. वर्षभरात सिमेंटचे दर 20 तर स्टीलचे दर तब्बल 50 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. विशेष म्हणजे पीव्हीसी पाईपचे दर तर गगनाला भिडले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. खडी, मजुरी, वाळू मिळत नसल्याने डस्टला देखील चांगला भाव मिळत आहे. यामुळे कोरोनापुर्वी मिळणारे बांधकामाचे साहित्यांची भाव वाढ झाल्याने घरबांधकामावर बोजा वाढला आहे.

Construction materials
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा मोहिते-पाटील!

कोरोना काळात लॉकडाउन करण्यात आल्याने सर्व प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे आयात-निर्यात होणा-या मालांची होणारी आवक ठप्प झाल्याने बांधकाम साहित्यांचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. वाहतूक सेवा बंद असल्याने आयात-निर्यात ठप्प झाली याचा परिणाम झाल्याने स्टीलचे दर प्रचंड वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर बांधकाम करणारे परप्रांतीय मजूर आपापल्या गावी गेल्याने शहरात मजुराचा तुटवडा जाणवत असल्याचे देखील बांधकाम व्यावसायिकांनी यावेळी सांगितले. मजुरांच्या तुटवडयामुळे याचा परिणाम मजुरीवर झाला आहे.

Construction materials
सावधान ! आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत सोलापूर शहरात जमावबंदी

मजुरीचे दर देखील वाढले असल्याने कोरोनापूर्वी एका दिवसाकाठी गंवडी कामास मजुरी 700 रुपये होती. आता मात्र 900 रुपये झाली असल्याचे बांधकाम करावे की नाही असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. खडीचे दर 2 हजार 300 रुपयांवरुन 3 हजारांवर पोहचले आहेत. पीव्हीसी पाईपचे दर एक नग घेण्यासाठी 400 रुपयांवरुन वाढून 600 रुपयांवर पोहचले आहेत. यामुळे बांधकाम प्रकल्पांचे पूर्वीनियोजित आर्थिक गणित बांधकाम व्यावसायिकांना आणि बांधकाम करून घेणाऱ्या नागरिकांना करावे लागत आहे. यामुळे शहरातील बांधकाम व्यावसायिक बांधकामांचे दर 300 रुपये चौरस फुटांनी वाढविण्याचा निर्णय घेण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Construction materials
महिन्यात दोन्ही डोस घ्या! 'नॅक'साठी सोलापूर विद्यापीठाचे अजब आदेश

ठळक बाबी...

- मजूर मिळत नसल्याने मजुरी वाढली

- कोरोना काळात वाहतूक बंदचा आयात-निर्यातीवर परिणाम

- बांधकामाशी संबंधित सर्वच साहित्यांची दरवाढ

- पावसाळ्यात स्टील, सिमेंटचे दर कमी होतात. मात्र, यंदाच्या वर्षी दर वाढलेलेच

- सिमेंटचे पोत्याचे दर पोहचले 400 रुपयांवर

बांधकामाच्या सर्वच साहित्यांचे दर वाढले आहेत. स्टील, विट, सिमेंट आदींचे दर वाढले आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात बांधकाम साहित्यांचे दर थोडे कमी होतात. मात्र, यंदाच्या वर्षी दर कमी न होता उलट वाढले आहेत.

- अभिजित म्हमाणे, बांधकाम व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com