
सोलापूर : संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शेकडो मराठा बांधव मुंबईला रवाना झाले आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय परत न येण्याचा निर्धार केलेल्या या आंदोलकांनी चटणी, भाकरी, ठेचा असे अन्नपदार्थ तसेच निवासाचे साहित्य सोबत घेतले आहे. आंदोलनस्थळी किती दिवस राहावे लागेल, हे सांगता येत नसल्यामुळे गावागावांमध्ये ठरलेल्या बैठकीतील सूचनेप्रमाणे आंदोलकांनी सर्व सोयीसुविधा आपल्यासोबत घेतल्या आहेत.