esakal | मोहोळ दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्यांना आता कोरोना टेस्टची सक्ती !

बोलून बातमी शोधा

Corona Test

मोहोळ दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्यांना आता कोरोना टेस्टची सक्ती !

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात होत असलेल्या खरेदी-विक्री व्यवहारातील खरेदी घेणारे व देणारे या दोघांच्याही आता कोरोना चाचण्या करणे बंधनकारक केले असल्याची माहिती प्रभारी दुय्यम निबंधक एम. व्ही. कानडे यांनी दिली.

या नवीन नियमामुळे सर्वसामान्यांची मोठी अडचण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य, जिल्हा, तालुक्‍यासह गाव पातळीवर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वरचेवर परस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासन जशा अडचणी येतील तसे नवे निर्बंध घालून कोरोना रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. मोहोळ हे मुंबई- हैदराबाद महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण आहे. मोहोळ शहरातून राज्यात कुठेही जाण्याची सुविधा आहे. त्यामुळे मोहोळचे शहरीकरण होत आहे. अनेक परगावचे शासकीय अधिकारीही निवृत्त झाल्यानंतर या ठिकाणीच स्थायिक झाले आहेत.

हेही वाचा: पोटनिवडणुकीनंतर पंढरपूरची विदारक परिस्थिती! हॉस्पिटल्स फुल्ल; वाढतेय बाधित व मृतांची संख्या

येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने खरेदीखते होत असतात. त्यामुळे आपसुकच गर्दी होते. या गर्दीला व कोरोनाला आळा घालण्यासाठी आता या विभागाने खरेदी देणार व घेणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या बंधनकारक केल्या आहेत. यासाठी स्टॅम्प व्हेंडर व्यावसायिकांनी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही दुय्यम निबंधक श्री. कानडे यांनी केले आहे.

मुद्रांक अन्‌ तिकिटांचा तुटवडा

तहसील कार्यालयाच्या आवारात नागरिकांना विविध कामांच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी स्टॅम्प व्हेंडर आहेत. त्यांचे परवाने नूतनीकरण झाले नाहीत. नूतनीकरणासाठीचे प्रस्ताव मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविल्याचे दुय्यम निबंधक एफ. डी. लिंबाळकर यांनी सांगितले. मुद्रांक व तिकिटे मिळत नसल्याने दररोजचे व्यवहार, बचत गटाचे व्यवहार, विविध बॅंकांसाठी तसेच न्यायालयीन कामकाजासाठी नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. गेल्या महिन्यात पाठवलेले नूतनीकरणाचे प्रस्ताव अद्यापही नूतनीकरण न झाल्यामुळे अडचणी वाढत आहेत. मुद्रांक विक्रेते सकाळी कार्यालयीन वेळेत येतात व दिवसभर बसून राहतात. त्यामुळे त्यांचाही व्यवसाय बुडतोय व नागरिकांची ही अडचण झाली आहे. याचा सर्वांत मोठा फटका वयोवृद्ध, अपंग व महिलांना बसत आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ! बाजार समितीत कांद्याला प्रतिक्‍विंटल शंभर ते बाराशेचा दर

स्टॅम्प व्हेंडरचे परवाने वरिष्ठांच्या सहीमुळे राहिले आहेत. दोन ते तीन दिवस सुट्टी असल्यामुळे अडचण झाली आहे. येत्या गुरुवारपर्यंत स्टॅम्प व्हेंडर यांचे नूतनीकरण केलेले परवाने मिळतील व पूर्ववत नागरिकांची सोय होईल.

- एम. व्ही. कानडे, प्रभारी दुय्यम निबंधक, मोहोळ