कोरोनाची सिनीऍरीटी, टाटांची मदत अन मुंबईची माणुसकी 

GATEWAY OF INDIA.jpg
GATEWAY OF INDIA.jpg

सोलापूरः पप्पा तुमच्या मध्ये कोविडचे टिपीकल लक्षणे दिसत आहेत. तुम्ही नक्की पॉझिटिव्ह येणार, हे शब्द आहेत वडिलांच्या आधी कोरोनाचा अनुभवात सिनीअर ठरलेल्या डॉ. दिग्विजय चव्हाण यांचे. एकाच घरात डॉक्‍टर पित्रापुत्र पॉझिटिव्ह असताना घेतलेला अनुभव, टाटांनी केलेली मदत आणि मुंबईच्या माणुसकीची झालर अशा कित्येक प्रसंगांनी या पित्रापुत्राचा कोरोनाचा अनुभवाची कहानी कोरोनामुक्तीने पुर्णत्वाला पोचली. 

हेही वाचाः सोलापूरच्या ग्रामीण भागात 251 नविन कोरोना बाधित 

शहरातील आश्‍विनी हॉस्पिटलचे भुलतज्ञ विभाग प्रमुख डॉ. विद्याधर चव्हाण हे मागील तीस वर्षापासून संचालक व विभागप्रमुख म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा डॉ. दिग्विजय चव्हाण हे मुंबई केईएम हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करतात. 

या कुटुंबात कोरोनाची सुरवात डॉ. दिग्विजय चव्हाण यांच्या पासून झाली. मुंबईत काम करताना डबे देणाऱ्याच्या लहान मुलगा डेंगी पॉझिटिव्ह आल्यावर तो उपचारासंबधी सर्व डॉक्‍टरांशी डबा देताना चर्चा करायचा. डेंगी थांबेना म्हणून कोरोना टेस्ट केली तर पॉझिटिव्ह निघाली. मग डॉ. दिग्विजय यांनी थेट टेस्ट करुन घेतली. टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून स्वतःच ऍडमिट केले. मुंबईत टेस्ट निगेटिव्ह येईपर्यंत दवाखान्यात ठेवतात. तेव्हा नवव्या दिवशी डॉ.दिग्विजय बरे होऊन परतले. त्यांच्या मेसमधील 28 कामगार पॉझिटिव्ह झाल्याने टाटांनी या डॉक्‍टरांना थेट पंधरा दिवस ताज या त्यांच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबवून त्यांना महिनाभराचे उच्च दर्जाचे जेवण दिले. सोलापूरला घरी परतण्यासाठी निघाले तर पेट्रोलपंपवाला पेट्रोलचे पैसे घेत नव्हता. मुंबई बाहेर पडले तर टोल नाका चालकाने टोल माफ केला. तोपर्यंत केईएम हॉस्पिटलने इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्‍टरांचा पगार आठ हजार वरुन थेट अठ्ठेचाळीस हजार रुपये करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना हा सुखद धक्का बसला. 
सोलापूरला आल्यानंतर डॉ. विद्याधर चव्हाण हे एक दिवस पावसाच्या रात्री झोपले असताना सकाळी उठताच त्यांना अंगदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांचा मुलगा डॉ.दिग्विजय यांनी तुम्हाला कोविडची टिपीकल लक्षणे दिसत आहेत. तुमची टेस्ट पॉझिटिव्ह येणार असे सांगितले. अगदी तसेच झाले. डॉ. दिग्विजय यांनी कोविडचा अनुभव घेतल्याने त्यांचे निरिक्षण अचुक ठरले. डॉ. विद्याधर चव्हाण हे स्वतः आश्‍विनी हॉस्पिटमध्ये जाऊन ऍडमिट झाले. सिटी स्कॅनमध्ये देखील कोविडची चिन्हे आढळत होती. थेट रेमिडिसीव्हीरची ट्रिटमेंट सुरु झाल्यानंतर पाचव्या दिवशी ते पूर्ण बरे झाले. कोविडच्या प्राथमिक अवस्थेत रेमीडिसीवीर इंजेक्‍शनचे मिळणारे चांगले परिणाम त्यावेळी उपचार घेणाऱ्या तीनही डॉक्‍टरांना अनुभवता आले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com