esakal | दुचाकी घसरून आईचा मृत्यू; पोटच्या मुलाविरूध्द गुन्हा

बोलून बातमी शोधा

Crime

या अपघातात मागे बसलेल्या सुनिता या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिस नाईक भाऊसाहेब दळवे यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. शेख हे करीत आहेत.

दुचाकी घसरून आईचा मृत्यू; पोटच्या मुलाविरूध्द गुन्हा
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : येथील अण्णाभाऊ साठे नगर रस्त्यावरून सुनिता चिंतामणी रेस (वय 42, रा. गोदुताई विडी घरकूल, कुंभारी) या त्यांच्या मुलासोबत दुचाकीवरून जात होत्या. नवीन घरकूल ते वारद चाळ (रेल्वे स्टेशन) या मार्गावर जाताना सुनिता रेस यांचा मुलगा दिनेश याने त्याच्याकडील दुचाकी अतिवेगाने व हयगयीने, निष्काळजीपणाने चालवली. दरम्यान, रेल्वे स्टेशनकडे जाताना दुचाकी घसरून खाली पडली. या अपघातात मागे बसलेल्या सुनिता या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिस नाईक भाऊसाहेब दळवे यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. शेख हे करीत आहेत.

हेही वाचा: पुण्यात टॅंकरची पळवापळवी ! ऑक्‍सिजनसाठी तीन तहसीलदार मुक्‍कामी

आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा छापा

सोलापूर : सध्या आयपीएल क्रिकेट सामने सुरु असून शहरात सट्टा बाजार तेजीत आहे. नागरिकांना ज्यादा पैशाचे अमिष दाखवून सट्टा घेतला जात आहे. शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप शिंदे यांनी मोमीन नगरात छापा टाकून जावेद अब्दुलगफार कलवल (वय 40, रा. मोमीन नगर) याला अटक केली. कारवाईच्या वेळी तो फोनवरून सट्टा घेऊन त्याचा हिशोब पुस्तकात लिहित असताना पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईल, एक टिव्ही, सेटअप बॉक्‍स यासह रोख रक्‍कम असा एकूण 52 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी मुळेगाव तांडा परिसरात अशीच कारवाई केली होती.

हेही वाचा: जिल्ह्यात होणार 21 ठिकाणी ऑक्‍सिजन निर्मितीचे प्लॅन्ट !

जिल्हाबंदीअंतर्गत 173 रस्ते बंद

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे शहर-जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाऱ्यांची पोलिसांमार्फत पडताळणी केली जात आहे. जिल्हाबंदीअंतर्गत जिल्ह्यात येणारे 173 रस्ते बंद करण्यात आले असून अत्यावश्‍यक सेवेसाठी व मालवाहतुकीसाठी 26 रस्ते खुले सोडण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दुसरीकडे पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्याने वन विभाग, आरटीओ, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अतिरिक्‍त बंदोबस्तही मागवून घेण्यात आला आहे. त्याठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून विनाकारण प्रवास करणाऱ्या तथा विनापरवाना प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जात आहे.