सोलापूर : ॲमेझॉनवरून मागविलेले धूपस्टॅण्डचे पार्सल आले होते, पण घरी कोणी नसल्याने ते परत गेले होते. त्यानंतर फिर्यादी उमेश काशीनाथ पाटील यांना व्हॉट्सॲप कॉल आला होता. पार्सल पाहिजे असल्यास ‘फोन पे’वर पाच रुपये पाठवा आणि फोन सुरूच ठेवायला सांगितले. त्याचवेळी समोरच्याने पाटील यांच्या खात्यातील ९० हजार रुपये लंपास केले. त्या सायबर गुन्हेगारास सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या सायबर टीमने बंगळुरू येथून जेरबंद केले आहे.