
Ajit Pawar’s Strong Reaction to Loan Waiver Request Sparks Debate
Esakal
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री आणि लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या भागात दौरे करत आहेत. या दौऱ्यात नेत्यांना नुकसानग्रस्तांच्या संतापाचाही सामना करावा लागत आहे. सरकारला कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत थेट बांधावरच विचारणा केली जातेय. ओल्या दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांसह सर्वांनीच मौन बाळगलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका तरुणाने कर्जमाफीबाबत विचारताच त्यांनी संताप व्यक्त केला. अजित पवार बुधवारी भूम-परांडा दौऱ्यावर होते. त्यांनी देवगाव खुर्द इथं पूरस्थितीची पाहणी केली. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला आणि पूरग्रस्तांची विचारपूस केली.