रामदास कोकरे यांचा 'शून्य कचरा व्यवस्थापन' CBSE च्या पुस्तकात

उपायुक्त रामदास कोकरे यांच्या या कार्याची दखल सीबीएसई बोर्डाने घेतली
Deputy Commissioner Ramdas Kokare
Deputy Commissioner Ramdas Kokareesakal
Updated on
Summary

उपायुक्त रामदास कोकरे यांच्या या कार्याची दखल सीबीएसई बोर्डाने घेतली.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : जगाला भेडसावणारा कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी रिटेवाडी (ता.करमाळा) येथील सुपुत्र तथा तत्कालीन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी अनोख्या कचरा वर्गीकरण पद्धतीचा स्वीकार करून कचरामुक्त शहराबरोबर कचरामुक्त डंपिंग ग्राउंड ही संकल्पना पुढे आणत शून्य कचरा व्यवस्थापन (Zero Waste Management) करत उल्लेखनीय काम केले होते. त्यांच्या या कार्याची दखल सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) घेतली असुन, इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात याबाबत धडा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील विद्यार्थी रामदास कोकरे (Deputy Commissioner Ramdas Kokare) यांच्या कामगिरीचा धडा गिरवणार आहेत. हि सोलापुरकरांसाठी आनंदाची बाब आहे.

Deputy Commissioner Ramdas Kokare
शिक्षणासाठी गवंड्यासोबत केलं काम, आता झाले उपजिल्हाधिकारी!

सध्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत असणारे रामदास कोकरे यांनी प्रशासनात आल्यानंतर मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासून, घनकचरा व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. कचरा संकलन व त्यावरील प्रक्रिया योग्य प्रकारे होण्यासाठी ओला-सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिक मुक्त, डम्पिंग मुक्त नगरपरिषद या संकल्पना राबवित त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी सुट्टीच्या दिवशीही हजेरी लावत संकल्पना प्रत्यक्षात साकार केल्या आहेत.

कोकरे यांच्या संकल्पनेतून शून्यकचरा व डंपिंग ग्राउंडमुक्त वेंगुर्ले, कर्जत व माथेरान या तिन्ही शहरांचा कायापालट झालेला असून, कल्याण डोंबिवलीमध्ये देखील अनुकरण होत आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेचा स्वच्छ भारत पर्यटन स्थळ कचरा व्यवस्थापन प्रकल्प हा आपल्या शून्य कचरा व्यवस्थापनासाठी देशभर आदर्श म्हणून गौरवला जात आहे. UNDP ही कौतुक केले आहे. वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत 27 प्रकारात कचरा वर्गीकरण व संकलन करून त्याचे इथे विघटन केले जाते. घनकचरा व्यवस्थापन अभ्यासाची पंढरी म्हणून वेंगुर्ला नगरपरिषदची दखल राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. तर माथेरान नगरपरिषद ने त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून माथेरान मधील डम्पिंग ग्राउंड मुक्त रस्त्याला रामदास कोकरे यांचे नाव देखील दिले आहे. त्यांची ही घनकचरा व्यवस्थापनातील संकल्पना राज्यात व देशात राबविण्यात आलेली आहे. वेंगुर्ल्यातील शून्य कचरा व्यवस्थापन उपक्रम अभ्यासासाठी आजतागायत लाखो लोकांनी भेटी दिल्या असून अनेक शाळा-कॉलेजच्या सहली देखील तिथे येतात.

Deputy Commissioner Ramdas Kokare
वर्षानुवर्ष दारूच्या व्यसनाधीन असलेले ४० हुन अधिकजण व्यसनातुन मुक्त

शालेय अभ्यासक्रमात घनकचरा व्यवस्थापन याबाबत साक्षरता निर्माण झाल्यास नक्कीच चांगला परिणाम होईल. हा विचार करून वेंगुर्ला घनकचरा व्यवस्थापन म्हणजेच कचरा विरहित डंपिंग ग्राउंड हा धडा CBSE सीबीएसई (केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड) बोर्डाने इयत्ता सहावी च्या विज्ञानाच्या पुस्तकात समाविष्ट केला आहे. एखाद्या अधिकाऱ्याने दूरदृष्टी ठेऊन चांगले काम केल्यास. त्याचा अभ्यासक्रमात समावेश करणे म्हणजे त्या अधिकाऱ्याचा त्या शहराचा गौरवच आहे. तसेच चांगले काम इतरांसाठी दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. त्यामुळे नक्कीच मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचे कार्य सोलापुरकरांसाठी सार्थ अभिमान वाटेल असेच आहे.

घनकचरा व्यवस्थापन ही एक जागतिक समस्या आहे. त्यावर मी एक परिणामकारक उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. नियुक्तीच्या ठिकाणी प्रभावीपणे अंमलबजावणी करत गेलो. त्यामुळे कर्जत, वेंगुर्ला, माथेरान ही शहरे कचरामुक्त डंपिग ग्राउंड आहेत. याचा अभ्यासक्रमात समावेश हि माझ्या कामाची पोचपावती असून माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश केल्याने येणारी पिढी कचरामुक्त संकल्पनेचा अभ्यास घेणारी निर्माण होईल याचा मला आनंद आहे.

- रामदास कोकरे, उपायुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com