सोलापूर : दरवर्षी लाडक्या गणरायाची वाजत गाजत मोठ्या उत्साहात गणेश मंडळे मिरवणूक काढतात. शहरातील मुख्य २५ किमी अंतरावरून मिरवणूक जाताना कोणताही त्रास होऊ नये म्हणून उत्सवापूर्वी येथील खड्डे बुजवून दुरुस्ती, तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि स्वच्छतेची कामे पूर्ण करणार असल्याचे महापालिका प्रशासनाने आश्वासन दिले होते. मात्र आयुक्तांच्या आदेशानंतरही ५० टक्के काम अजूनही अपूर्णच आहे. त्यामुळे लाडक्या गणरायाचे आगमन यंदा खड्ड्यातून होणार आहे.