Devotees at Shri Swami Samarth Temple, Akkalkot — temple to remain open for 20 hours during Diwali rush.
Sakal
सोलापूर
Solapur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'श्री स्वामी समर्थ मंदिर राहणार २० तास खुले'; दिवाळी सुट्ट्यांमधील गर्दीमुळे मंदिर समितीचा निर्णय
Swami Samarth Mandir: दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे १६ ऑक्टोबरपासून येत्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाटे ३ ते रात्री ११ असे नियमितपणे २० तास खुले राहणार आहे.
अक्कलकोट: श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे २० तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली.

