esakal | फटाके फुटले; दिवे अजून विझेनात! 
sakal

बोलून बातमी शोधा

Discussion on Prime Minister Narendra Modis statement

कोरोनापुढे सध्या जग हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यावर अद्यापही लस उपलब्ध नसल्याने त्याचा प्रादुर्भाव कसा कमी करायचा, हा प्रश्‍न आहे. गर्दी न करणे हा एकच त्यावर उपाय आहे. देशभर तो पसरत असल्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चपासून देश लॉकडाउन केला आहे. तरीही त्याचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे.

फटाके फुटले; दिवे अजून विझेनात! 

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (ता. 5) रात्री नऊ वाजता अपवाद वगळता सर्वत्र दिवे लावण्यात आले. यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी मशाल यात्रा काढली, तर काहींनी फटाकेही फोडले. मोदींच्या या आवाहनाचे अनेकांनी समर्थन केले, तर अनेकांनी त्याला विरोधही केला. हा दिवे लावण्याचा कार्यक्रम होऊन दोन दिवस झाले, तरी यावरची चर्चा काही थांबताना दिसत नाही. "एक, दोन नाही तर 14 हजार दिवे आम्ही लावतोय, यातून हजारो रुग्णांचा जीव वाचू शकतो. कामातून उत्तर देणे हीच आमची परंपरा आहे. देशातील सगळ्यात मोठा आयसोलेशन आणि क्वारंटाइन झोन महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाने उभा केला आहे', असे ट्‌विट राज्याचे गृहनिर्माण मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. 

हेही वाचा : तो पुण्याहून आला चालत अन्‌ मग... 
कोरोनापुढे सध्या जग हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यावर अद्यापही लस उपलब्ध नसल्याने त्याचा प्रादुर्भाव कसा कमी करायचा, हा प्रश्‍न आहे. गर्दी न करणे हा एकच त्यावर उपाय आहे. देशभर तो पसरत असल्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चपासून देश लॉकडाउन केला आहे. तरीही त्याचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्य, गरीब व हातावर पोट असणाऱ्या कामगारांचा पोटाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोणीही उपाशी राहू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. शेतकरी, उद्योग व व्यवसाय यावरही याचा परिणाम होत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांची व्यवस्था करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. रेल्वेसुद्धा यामध्ये पुढे आली असून रेल्वेतही रुग्ण ठेवण्याची व्यवस्था केली जात आहे. यातच महाराष्ट्रात गृहनिर्माण विभागाने 14 हजार घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आव्हाड यांनी याबाबत ट्‌विट केलेले आहे. त्यात मोदी यांचे नाव घेतले नसले तरी "एक, दोन नाही तर 14 हजार दिवे आम्ही लावतो...' असं म्हटलं आहे. यात दिव्यांचा उल्लेख केल्याने मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला हे उत्तर असल्याचे मानले जात आहे. आव्हाड हे शरद पवार यांचे विश्‍वासू आहेत. 

हेही वाचा : शरद पवार यांनी आपल्या विश्‍वासूला सोलापुरात का आणले? 
मुख्य मुद्दा हाच पुढे काय? 

राजकीय विश्‍लेषक हेमंत देसाई म्हणाले, मोदी यांनी दिवे बंद करायचे आणि मेणबत्या लावायच्या हे आंदोलन पार पाडले. यात सेलिब्रिटी, क्रिकेटपटू असे अनेकजण सहभागी झाली. आम्ही एक होऊ, कोरोनाच्या मुकाबल्यासाठी एकजूट दाखवू असे सांगितले. पण पुढे काय? असा प्रश्‍न केला. सुरवातीला टाळ्या, थाळ्या वाजवायला सांगितल्या. तेव्हा लोक एकत्र आले. यातून सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले. यातून मुख्य मुद्दा हाच आहे, की पुढे काय? हा सगळा "दिव्याखाली अंधार' असा प्रकार आहे, असं "मॅक्‍स महाराष्ट्र'च्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे. 

मोदींचे आव्हान हे ऐतिहासिक 
निखिल वागळे यांनी म्हटलं, की कोरोनाची दिवाळी झाली. हे ऐतिहासिक होते. दिवे लावण्याचे आवाहन केलेले मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. मोदी हे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये अत्यंत कुशल आहेत. त्याचा आतापर्यंतचा कोणताही इव्हेंट अपयशी ठरलेला नाही, असं "मॅक्‍स महाराष्ट्र'च्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे.

loading image