वकीलसायबांवर अन्याय झालाय की !

वकीलसायबांवर अन्याय झालाय की !
वकीलसायबांवर अन्याय झालाय की !
वकीलसायबांवर अन्याय झालाय की !esakal
Summary

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार हाय... त्येमुळं वातावरण हळूहळू तयार हु लागलंया...

खरं तर शहर मध्यमधी आमच्या समाजाचं स्थान मोठ्ठं असताना या ताईलाच कितीयेळा निवडून देयाचं... सायबांचं नेतृत्व मान्य केलं... ते आमचं नेते हायती... त्येंना दोनयेळा लोकसभेवर पाठवलं... एकदा तर खुल्या जागेवर आरक्षित असूनबी त्येंना संधी दिली... आता लोकसभा निवडणुकीत दोनयेळा सायब पडत्यात म्हंजी त्येंना याफुढं विश्रांतीची गरज हाय... तसंच ताईला लोकसभा निवडणूक लढवायला लावून हा मध्य मतदारसंघ आमच्या समाजाला द्येयाला फायजे... दोन माजी महापौर या एका मुद्‌द्‌यावर बंड करत हुते... त्यातले एक वकीलसायब आता तर कॉंग्रेसच्या (Congress) धोरणांना अन्‌ मध्यमधी संधी मिळत नसल्याचं समजल्यानं मोठ्या सायबास्नी महेशअण्णांच्या घरी भेटलेबी... शहरात राष्ट्रवादीचं वातावरण चांगलं हाय म्हनूनशान ते आता राष्ट्रवादीच्या (NCP) वाटेवर हायती...

वकीलसायबांवर अन्याय झालाय की !
HERO चा धमाका! महिन्यात 7 हजारहून अधिक इलेक्‍ट्रिक स्कूटरची विक्री

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार हाय... त्येमुळं वातावरण हळूहळू तयार हु लागलंया... त्येतबी राष्ट्रवादीकडनं यंदा मोठी फिल्डींग लावली गेली हाय... महेशअण्णा आधी सायबाचं नेतृत्व मान्य केल्तं तवा कॉंग्रेसमधून नंतर बंडखोरी करून शिवसेनेत गेलं.. नगरसेवक म्हणून निवडूनबी आलं... परंतु इधानसभेला तिथंबी डाळ शिजली नसल्यानं आता राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर हायती... अण्णा राष्ट्रवादीत आल्यानं राष्ट्रवादीतील एका गटाला आनंद झालाय अन्‌ पंत, भाऊ मंडळी मात्र चिंतेत हायती... ह्यो नवा नेता फुढं गेला तर आपल्या नेतृत्वाचं काय ? आपला पत्ता आपुआपच कट हुईल या भितीनं त्येंना घेरलंया... वरवरचं दाखवायचं म्हनूनशान ही सर्व मंडळी आता अण्णाला सपोर्ट करु लागलीया... पण अण्णाइरोधात भविष्यात काय राजकारण हुईल हे कळणारबी नाय... असे पत्ते हे टाकत्यात... भाऊच्या शिफारशीसाठी मुंबईला चाललोय असं सांगणाऱ्या पंतांच्या खिशातलं पत्र वाचल्यावरच समजलं की त्ये भाऊची तक्रार करत हुते... आमदार निवासात शर्टाच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीच्या या किस्सावर सगळेच चवीनं चर्चा करत्यात अन्‌ हसत्यात बी... त्यामुळं निवडणुकीच्या निकालापर्यंत वाट पहावी लागणार हाय... कोण किती पाण्यात हाय ते ? कोणाचं राजकारण कसं चालतंया ते ? मोठ्ठं सायब म्हणत्यात म्हनून तर सध्या सगळे कार्यक्रमात तर एका व्यासपीठावर दिसत्यात. बघू या नेमके काय हुतंय ते ? कॉंग्रेसमदी सायबाच्या जवळ कोण यावरनं अण्णा आणि सुधीरभाऊमदी तवा इस्तू आडवा जात नव्हता... आता दोघंबी एकमत करुनशान राष्ट्रवादीत हायती...

वकीलसायबांवर अन्याय झालाय की !
भुरट्यांचा मोर्चा पिकांकडे! शेतकऱ्यानेच पकडले डाळिंबचोराला रंगेहाथ

राष्ट्रवादीनं विलेक्‍शनची तयारी जोमात सुरु केल्यानं वकीलसायब त्येंच्या दिखाव्याला बळी पडू लागल्याचं दिसतंया... तसं वकीलसायब निष्ठावंत गटातलं... पण अलिकडील काळात त्येंनी आपला पवित्रा बदलला हाय... कॉंग्रेसकडनं अन्याय झालेल्या या वकीलसायबास्नी पक्षाकडंनं महापौर, सभागृह नेता, नगरसेवक, दोनवेळा स्वीकृत नगरसेवक, पक्ष अध्यक्ष, सोशल अर्बन बॅंक, लष्कर व ऑफिसर क्‍लबम्होरं संस्थेसाठी जागा, डीपीडीसीत सदस्यत्व, सदनिका इतकं सगळं मिळालं... महापालिका निवडणुकीत पक्षातीलच फिरदोसदीदीला त्रास देण्याचीही मोहीमबी झाली. त्यो शौकतपैलवान पाठीशी असल्यानं फिरदोसदीदीचं फावलं नायतर अवघड हुतं... बगू या म्होरं म्हंजी घोडा मैदान जवळच हाय... काय काय हुतंय ते ?

- थोरले आबासाहेब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com