दूध संघाची 26 फेब्रुवारीला निवडणूक! नेत्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला

अर्ज माघार घेण्याच्या दिवशी (मंगळवारी) 55 जणांनी उमेदवारी अर्ज माघे घेतला. त्यामुळे आता दूध संघाच्या 16 जागांसाठी 31 उमेदवारांचे 32 अर्ज आहेत. नेत्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जिल्हा दूध संघ निवडणूक
जिल्हा दूध संघ निवडणूकesakal

सोलापूर : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी क्रियाशिल संस्था सभासद प्रतिनिधी (सर्वसाधारण), महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग, ओबीसी व भटक्‍या विमुक्‍त जाती-जमाती व विशेष प्रवर्ग, अशा 17 जागांसाठी 87 उमेदवार रिंगणात होते. अर्ज माघार घेण्याच्या दिवशी (मंगळवारी) 55 जणांनी उमेदवारी अर्ज माघे घेतला. त्यामुळे आता दूध संघाच्या 16 जागांसाठी 31 उमेदवारांचे 32 अर्ज आहेत. नेत्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिल्हा दूध संघ निवडणूक
SSC, HSC Exam : पेपरसाठी साडेतीन तास वेळ, परीक्षा त्यांच्याच शाळेत

अडचणीत असलेल्या दूध संघाला पुन्हा उर्जितावस्था आणण्याच्या दृष्टीने ही निवडणूक खूप महत्त्वाची मानली जात आहे. निवडणुकीनंतर दूध संघावर पुन्हा एकदा संचालक मंडळ दिसेल. तत्पूर्वी, दूध संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, प्रशांत परिचारक, माजी आमदार दिलीप सोपल, राजन पाटील, दिलीप माने यांच्यासह सर्वच नेत्यांनी बैठका घेतल्या. तरीही, बचाव पॅनलने त्यांची मागणी सोडली नाही. परंतु, ओबीसी प्रवर्गातून आपला उमेदवार बिनविरोध करण्यात नेत्यांना यश मिळाले. आता क्रियाशिल संस्था सभासद प्रतिनिधीच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी त्यांना ताण काढावा लागणार आहे. आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजिव व आमदार संजय शिंदे यांचे पुतणे रणजितसिंह शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल यांचे पुतणे योगेश सोपल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची सून वैशाली जितेंद्र साठे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. न्यायालयाच्या निकालामुळे दिलीप माने यांनी निवडणुकीत माघार घेतली. वैशाली साठे या अपक्ष म्हणून महिला प्रतिनिधीतून स्वतंत्रपणे लढत आहेत. चिन्हासह उमेदवारांची यादी उद्या (बुधवारी) सकाळी 11 वाजता प्रसिध्द होणार असून 26 फेब्रुवारीला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास पॅनलचे 16 जागांसाठी 16 उमेदवार निवडणूक लढवित असून तीन अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. महिला प्रतिनिधीच्या दोन जागांसाठी सात महिला रिंगणात असून त्यात या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे 27 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे.

जिल्हा दूध संघ निवडणूक
'ई-श्रम'वर करा नोंदणी! दरमहा मिळेल तीन ते पाच हजारांची पेन्शन व निवृत्ती वेतन

महाविकास पॅनलचे उमेदवार
क्रियाशिल संस्था सभासद प्रतिनिधीच्या 12 जागांसाठी रणजितसिंह शिंदे, योगेश सोपल, बाळासाहेब माळी, बबनराव आवताडे, संभाजी मोरे, राजेंद्र मोरे, मनोज गरड, मारुती लवटे, विजय यलपल्ले, औदुंबर वाडदेकर, अलका चौगुले, वैशाली शेंबडे हे तर महिला प्रतिनिधीच्या दोन जागांवर निर्मला काकडे व छाया ढेकणे यांना उमेदवारी मिळाली आहे. अनुसूचित जाती-जमातीमधून जयंत साळे तर भटक्‍या विमुक्‍त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील एका जागेसाठी राजेंद्रसिंह पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जिल्हा दूध संघ निवडणूक
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी पावणेदोन कोटींचा निधी

बचाव पॅनलचे उमेदवार
क्रियाशिल संस्था सभासद प्रतिनिधीतून सारिका पाटील, अनिल आवताडे, भाऊसाहेब धावणे, संजय पोतदार, सुवर्णा इंगळे, सुनीता शिंदे, कांचन घाटगे, पार्वतीबाई वागज हे आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महिला प्रतिनिधीच्या दोन जागांसाठी बचाव पॅनलसह इतर दोन, अशा चार महिला निवडणूक लढवित आहेत. त्यात संगिता लोंढे, सारिका पाटील, सुनीता शिंदे, सरस्वती भोसले हे आहेत. सारिका पाटील यांनी सर्वसाधारण व महिला प्रतिनिधी या दोन्ही ठिकाणी अर्ज ठेवला. अनुसूचित जाती-जमातीतून मंगल केंगार, भटक्‍या विमुक्‍त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातून रमजान नदाफ निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

"ओबीसी'तून दीपक माळी बिनविरोध
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत इतर मागास प्रवर्गातून रमेश बारसकर, सुरेश हसापुरे यांच्यासह दहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील नऊजणांनी माघार घेतल्याने आता केवळ दीपक माळी यांचा एकमेव अर्ज राहिला आहे. त्यामुळे दूध संघाच्या संचालकपदी ते पुन्हा एकदा दिसतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com