माजी आमदार दिलीप माने जाणार उच्च न्यायालयात

जिल्हा दूध संघ निवडणूक : विभागीय दुग्ध उपनिबंधकांनी फेटाळले 10 जणांचे अपिल
 MLA Dilip Mane
MLA Dilip Manesakal

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने अपिलात गेलेले माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह 10 जणांचे अपिल विभागीय दुग्ध उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी आज फेटाळले आहे. या निर्णयाच्या विरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती माजी आमदार दिलीप माने यांनी दिली.

उमेदवारी अर्ज छाननीत दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीप माने, माजी संचालक दिपक माळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्यासह 26 जणांचे अर्ज बाद झाले. त्यापैकी दाजी दोलतडे, बळीराम साठे, दिलीप माने, दिपक माळी, सिद्धेश्वर आवताडे, संतोष वावरे, सरस्वती भोसले, संताजी पाटील, तायप्पा गरंडे, संगीता लोंढे या दहा जणांनी डॉ. कदम यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यांच्या अपिलावर मंगळवारी (ता. 8) सुनावणी झाली. या सुनावणीचा निर्णय आज दिला आहे.

जिल्हा दूध संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिलेला निकाल विभागीय दुग्ध उपनिबंधक डॉ. कदम यांनी कायम ठेवला आहे. मंगळवारी (ता. 15) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत आहे. दरम्यान डॉ. कदम यांच्या निर्णया विरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माजी आमदार माने यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दूध संघाच्या निवडणुकीत राजकारण आणखी रंजक वळणावर जाणार हे निश्‍चित.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com