सोलापूर : उद्धव व राज ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र आल्याची घोषणा केली नाही. त्यांच्यात एकत्र येण्याची हिंमत आहे का, असा खोचक सवाल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. तसेच त्यांनी एकत्र आल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांना शंभर प्रश्न विचारू, असेही त्यांनी म्हटले.