esakal | "शिवशाही'च्या प्रवाशांची घटली संख्या! ट्रॅव्हल्सला देखील संमिश्र प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

Shivshahi Bus

"शिवशाही'च्या प्रवाशांची घटली संख्या! ट्रॅव्हल्सलाही संमिश्र प्रतिसाद

sakal_logo
By
विजय थोरात

तिकीट दरवाढ व आर्थिक टंचाईमुळे बहुतांश प्रवाशांनी शिवशाही बसकडे पाठ फिरविली आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भीतीने अनेक प्रवासी बसमधील गर्दीतील प्रवास टाळत आहेत. तर तिकीट दरवाढ व आर्थिक टंचाईमुळे बहुतांश प्रवाशांनी शिवशाही बसकडे पाठ फिरविली आहे. खासगी ट्रॅव्हल्सला देखील संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याने या वाहतुकीचे उत्पन्न खालावले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एसटीची Maharashtra State Transport) प्रवासी सेवा पूर्ववत सुरू झाली. लांब पल्ल्याच्या बस सुरू झाल्या. विविध मार्गावरील बसला प्रतिसादही वाढला आहे. मात्र उद्योग, व्यवसायानिमित्त पुणे (Pune), मुंबई (Mumbai), हैदराबाद (Hyderabad)) व इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी खासगी ट्रॅव्हल्स व रेल्वेला पसंती देत आहेत. (Due to Corona has reduced the response of passengers to Shivshahi bus-ssd73)

हेही वाचा: आषाढी कालावधीमधील संचारबंदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

एसटीची शिवशाही बससेवा (Shivshahi Bus) देखील सध्या तोट्यात धावत आहे. कोरोनात अनेकांच्या पगाराला, रोजगाराला कात्री लागल्याने आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बहुतांश जणांची शिवशाहीऐवजी साध्या बसमध्ये प्रवासाची ओढ आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही मोजक्‍याच प्रवाशांना घेऊन धावत आहे. याचा मोठा आर्थिक फटका महामंडळाला सहन करावा लागत आहे. सध्या पुणे, हैदराबाद, मुंबई या मार्गावर सोलापूर विभागातून "शिवशाही'च्या फेऱ्या सुरू असून, सोलापूर विभागातून सुरू असलेल्या एकूण शिवशाही बसची संख्या 15 एवढीच असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: रिंगण सोहळ्यातील स्वर्गीय सुखाला मुकलो! पुरंदावडेतील मैदान सुनेसुने

या मार्गावर सुरू आहेत शिवशाही

  • सोलापूर- पुणे

  • सोलापूर- हैदराबाद

  • अकलूज- परेल

  • अक्कलकोट- पुणे

कोरोना विषाणूच्या कडक निर्बंधातून सूट मिळाल्यानंतर सोलापूर विभागाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सोलापूर- पुणे ही शिवशाही बस सेवा सुरू केली. या बसच्या नियमित फेऱ्या सुरू आहेत. तर दुसरीकडे या मार्गावरील साध्या बसला प्रवाशांची अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे.

विभागात एकही स्लिपर शिवशाही नाही

राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागात केवळ 15 शिवशाही गाड्या सुरू आहेत. मात्र या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यंत कमी आहे. विभागामध्ये एकही स्लिपर शिवशाही नसल्याने प्रवासी लांब पल्ल्याचा प्रवास शिवशाहीने टाळत असून, ते ट्रॅव्हल्सचा आधार घेत आहेत. त्यामुळे शिवशाहीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

loading image