एसटी संपामुळे 'पीएचडी'च्या मुलाखती ऑनलाइन! आजपासून मुलाखती

एसटी संपामुळे 'पीएचडी'च्या मुलाखती ऑनलाइन! आजपासून मुलाखती
एसटी संपामुळे 'पीएचडी'च्या मुलाखती ऑनलाइन! आजपासून मुलाखती
एसटी संपामुळे 'पीएचडी'च्या मुलाखती ऑनलाइन! आजपासून मुलाखतीesakal
Summary

आता 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात मुलाखती होणार आहेत. एसटी संपामुळे बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांना ऑनलाइन मुलाखत देता येईल.

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) पेट परीक्षेचा (PET Exam) निकाल जाहीर होऊन महिना उलटला. परंतु, अजूनही मुलाखती होऊन प्रवेश प्रक्रियेला सुरवात झालेली नाही. गुणवत्ता यादीनंतर मुलाखतीची यादी प्रसिद्ध झाली. मुलाखतीचे वेळापत्रक ठरवूनही त्या दोनदा पुढे ढकलण्यात आल्या. आता 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात मुलाखती होणार आहेत. एसटी संपामुळे बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांना ऑनलाइन मुलाखत देता येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

एसटी संपामुळे 'पीएचडी'च्या मुलाखती ऑनलाइन! आजपासून मुलाखती
इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाइंग ब्रॅंच व ग्राउंड ड्यूटी पदांची भरती

सोलापूर विद्यापीठाने प्रथमच 795 जागांसाठी पीएचडीची पेट परीक्षा घेतली. प्रत्येक जागेसाठी तीन उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्याचे नियोजन ठरले. मात्र, मागासवर्गीय प्रवर्गातील बहुतेक विद्यार्थी खुल्या प्रवर्गातही अव्वल ठरले. त्यांना दोन ठिकाणी संधी मिळाली, आता त्यांच्या पसंतीनुसार त्यांना त्या- त्या प्रवर्गातून प्रवेश दिला जाणार आहे. रिक्‍त जागेवर दुसरा उमेदवार घेतला जाणार आहे. दरम्यान, या 'पेट'साठी मुंबई, नगर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, उस्मानाबाद यासह अन्य जिल्ह्यांमधील उमेदवारांनी अर्ज केले होते.

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. या संपामुळे दोनदा मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, अजूनही एसटीचा संप मिटला नसून तो कधीपर्यंत मिटेल, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने मंगळवारपासून (ता. 30) मुलाखती घेण्याचे नियोजन केले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली परजिल्ह्यातील उमेदवारांसाठी ऑनलाइन मुलाखतीची सोय उपलब्ध करून दिल्याची माहिती प्रशासन अधिकारी डॉ. विकास कदम यांनी दिली.

एसटी संपामुळे 'पीएचडी'च्या मुलाखती ऑनलाइन! आजपासून मुलाखती
UPSC करणार सहाय्यक व सहयोगी प्राध्यापकांची भरती! जाणून घ्या सविस्तर

ठळक बाबी...

  • सोलापूरसह परजिल्ह्यातील एक हजार 285 उमेदवार देणार 'पीएचडी'ची मुलाखत

  • 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात मुलाखती घेण्याचे विद्यापीठाने केले नियोजन

  • मुंबई, नागपूरसह परजिल्ह्यातील उमेदवारांची विद्यापीठाकडे ऑनलाइन मुलाखतीची विनंती

  • व्हॉट्‌सऍप अथवा लॅपटॉपवरून देता येणार त्या उमेदवारांना ऑनलाइन मुलाखत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com