
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : दामाजी कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे या भूमिकेतून इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊस गाळप करुन ऊस उत्पादकांना दिलेल्या शब्दाप्रमाणे तीन वर्षे स्पर्धेत राहून एफ.आर.पी.पेक्षा जास्त ऊस दर वेळेत दिला. या शिवाय कामगारांचे पगारही दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत दिल्याचे मत अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले.