esakal | पर्यावरणपूरक बाप्पांची क्रेझ! कोरोनामुळे सार्वजनिक उत्सवावर निर्बंध
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

पर्यावरणपूरक बाप्पांची क्रेझ वाढल्याचे चित्र बाजारात पहायला मिळत आहे.

पर्यावरणपूरक बाप्पांची क्रेझ! कोरोनामुळे सार्वजनिक उत्सवावर निर्बंध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर यंदाही सार्वजनिक गणोशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती खरेदी करून घरातच विर्सजनाची तयारी सर्वांनी केली आहे. त्यातूनच पर्यावरणपूरक बाप्पांची क्रेझ वाढल्याचे चित्र बाजारात पहायला मिळत आहे.

हेही वाचा: महिन्यात दोन्ही डोस घ्या! 'नॅक'साठी सोलापूर विद्यापीठाचे अजब आदेश

शहरातील माहेश्‍वरी विद्याप्रचारक मंडळ, पुणे संचलित म. फ. दमाणी प्राथमिक विद्या मंदिरात इकोफ्रेंडली गणपती तयार करण्याची कार्यशाळा पार पडली. यावेळी वृक्ष गणपती, अन्न गणपती, मृदा गणपती अशा पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आल्या. वृक्ष गणपतीमध्ये मातीत बिया मिसळून व गणेशाच्या अलंकारासाठी लहान-लहान धान्यांचा वापर केला जातो. वृक्षसंवर्धन व वृक्षारोपणासाठी तो बाप्पा प्रेरक आहे.

हेही वाचा: अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

अन्न गणपती हा धान्याच्या पिठापासून बनविला जातो. जलचरांसाठी तो पूरक ठरतो. मृदा गणपती हा तांबड्या मातीपासून बनविला जातो. ती मूर्ती आपण घरातील मोठ्या भांड्यात विसर्जन करू शकतो. शाळेतील सर्व शिक्षिकांनी त्या मूर्ती नेल्या असून त्याच्यातून मुलांनाही प्रेरणा मिळाली. प्रशालेतील कलाशिक्षक मल्लिनाथ जमखंडी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिकांनी पर्यावरणपूरक मूर्ती बनविल्या. यावेळी मुख्याध्यापिका निर्मला भोसले, शितल महिमाने, योगिता जाधव, देविदास शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: सोलापूर-पुणे हुतात्मा एक्‍सप्रेस दुसऱ्यांदा रद्द

"ज्ञानप्रबोधिनी'त लाल मातीचे गणपती

यंदाचा गणेशोत्सव सार्वजनिक पध्दतीने साजरा केला जाणार नाही. त्यामुळे घरगुती उत्सव साजरा करण्याकडे सर्वांचा कल आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घराबाहेर न पडता, घरातील एका भांड्यात मूर्ती विसर्जनाची तयारी त्यांनी केली आहे. शहरातील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत चेतन कांबळे, सागर दिंडे या तरूणांनी लाल मातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती बनविल्या आहेत. सार्वजनिक विक्रीसाठीही त्याठिकाणी माफक दरात मूर्ती ठेवल्याचे चेतन कांबळे यांनी सांगितले.

loading image
go to top