
कऱ्हाड : येथील कृष्णा नाक्यावर एका इलेक्ट्रिक मोटारसायकलला अचानक आग लागली. मोटारसायकलमधून अचानक धूर निघू लागल्याने आग लागल्याचे लक्षात आले. काही वेळात गाडीने पेट घेतला. त्याची माहिती मिळताच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.