esakal | वीज वितरणाचा अजब कारभार; मोडनिंब ग्रामपंचायतची तीन महिन्याची थकबाकी चार कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

वीज

प्रचंड पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे आणि पथदिव्याअभावी रस्त्यावरील अंधार अशा दुहेरी संकटात सध्या ग्रामस्थ अडकले आहेत.

मोडनिंब ग्रामपंचायतची तीन महिन्याची थकबाकी चार कोटी; गावात अंधार

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

मोडनिंब (सोलापूर): थकीत बिल वीज बिलापोटी वीज कंपनीने मोडनिंब येथील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. गेल्या सहा दिवसांपासून मोडनिंबकरांना अंधाराशी सामना करावा लागत आहे. प्रचंड पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे आणि पथदिव्याअभावी रस्त्यावरील अंधार अशा दुहेरी संकटात सध्या ग्रामस्थ अडकले आहेत.

हेही वाचा: सोलापूर: मोडनिंब येथे संजीवनी दोशी यांचे सल्लेखना व्रताचा सोहळा

महावितरणने मोडनिंब ग्रामपंचायतकडे तीन कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी दाखवून पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला. ग्राम पंचायतच्या नावावर पथदिव्यांसाठी जवळपास 10 विजजोडण्या आहेत. यापूर्वी पथदिव्यांचे वीजबिल महाराष्ट्र शासनाकडून भरले जायचे. ग्रामपंचायतीने विजदेयकाची रक्कम भरावी, असे आदेश शासनाने नुकतेच काढले. तरीही त्या सर्वांचे सरासरी 18 ते 20 लाख वीजबिल थकीत दाखविल्याने विज मंडळाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. यातील बऱ्याचशा जोडण्या अनेक काळापासून बंद अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी वीज मंडळाने मागच्या आठवड्यात जुने मीटर बसवून ते कायदेशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा भुर्दंड ग्राम पंचायतीला बसणार आहे. वीज मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे गावगाड्याची अर्थव्यवस्था अंधारात ढकलली गेली आहे. कोविड काळात मोडनिंब ग्रामपंचायतीची कर वसुलीची थकबाकी जवळपास 4 कोटींवर पोहोचली आहे. एकीकडे कर वसुली बंद तर दुसऱ्या बाजूने विज देयकाची थकबाकी अशा कात्रीत मोडनिंब ग्रामपंचायतीचे कारभारी कसा मार्ग काढतात हा औत्सुक्‍याचा मुद्दा झाला आहे.

हेही वाचा: मोडनिंब येथील युवकाच्या खून प्रकरणी दोघांना जन्मठेप ! प्रत्येकी पाच हजार रुपये दंड 

तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतीसमोर पथदिव्याची विजदेयके थकबाकीचे प्रश्न आहे. कोविडमुळे ग्राम पंचायतची करवसुली थांबली आहे. करवसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. वीज देयकांची रक्कम एवढी आहे का? याची खात्री करूनच ती रक्कम भरली जाईल.

- डॉ. संताजी पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कुर्डुवाडी

loading image
go to top