सोलापूर: मोडनिंब येथे संजीवनी दोशी यांचे सल्लेखना व्रताचा सोहळा

सोहळ्याचा मंगळवार हा चौथा दिवस असून, धर्मगुरू श्रृतमती माताजी यांच्या मार्गदर्शना खाली हा सोहळा सूरू आहे.
संजीवनी दोशी
संजीवनी दोशीSAKAL
Summary

मोडनिंब च्या इतिहासातील असा पुण्यप्रद क्षण प्रथमच आल्याने व याला मोठे महत्त्व असल्याने सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, कोल्हापूर, पुणे, सातारा आदीसह अन्य ठिकाणाहून या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जैन श्रावक श्राविका दर्शनासाठी येत आहेत.

मोहोळ (सोलापूर): मोडनिंब ता माढा येथील श्री पद्मप्रभु दिगंबर जैन चारिटेबल संस्था निर्मित 1008 मुनीसुरतनाथ दिगंबर जैन मंदिरात येथे बारामती स्थित श्रीमती संजीवनी अभयकुमार दोशी यांनी आपले जीवन जैन धर्माच्या मान्यतेनुसार मृत्यूकडे वाटचाल करण्याचा सल्लेखना व्रत हा नियम घेऊन निर्धार केल्याची माहिती माजी उपसरपंच विशाल मेहता यांनी दिली. दरम्यान मोडनिंब च्या इतिहासातील असा पुण्यप्रद क्षण प्रथमच आल्याने व याला मोठे महत्त्व असल्याने सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, कोल्हापूर, पुणे, सातारा आदीसह अन्य ठिकाणाहून या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जैन श्रावक श्राविका दर्शनासाठी येत आहेत. दरम्यान या सोहळ्याचा मंगळवार हा चौथा दिवस असून, धर्मगुरू श्रृतमती माताजी यांच्या मार्गदर्शना खाली हा सोहळा सूरू आहे.

संजीवनी दोशी
सातारा : याचिकेमुळे जिल्हा बॅंकेची मतदार यादी लटकली

यासंदर्भात अधिक माहिती अशी की ,श्रीमती संजीवनी दोशी या जरी बारामती स्थित असल्या तरी त्यांचे आजोळ हे मोडनिंब आहे. त्यांचे आजोबा स्व. वालचंद नानचंद शहा हे मोडनिंब पंचक्रोशीतील प्रख्यात विधिज्ञ होते, तर ते कादंबरीकार ही होते. त्यांनी विविध विषयावर सुमारे बारा कादंबऱ्या लिहिल्या आहेत, तर त्यापैकी दोन कादंबऱ्या या मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात होत्या. श्रीमती दोषी यांनी 1917 साली श्रीमती दोशी यांनी प्राथमिक शाळा उमाराजे पटवर्धन यांच्या मदतीने सुरु केली. त्याच शाळेत त्या गणित व इतर विषय शिकवत त्यामुळे मोडनिंबशी त्यांची नाळ आज ही जोडलेली आहे. दोशी यांना एका दुर्धर आजाराने गाठल्याने त्यांनी जीवन त्याग करण्याची इच्छा व्यक्त केली.

संजीवनी दोशी
रायगव्हाण व तावरजाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल

त्यांनी अनेक ग्रंथांचे वाचन करून त्याचे मराठीत भाषांतर केले. त्यांनी या पार्श्वभूमीवर आजोबांचा वारसा टिकवला आहे. या मृत्यू महोत्सवासाठी त्यांचे कुटुंबीय अभय कुमार दोशी, शितल व अजय दोशी, तरुणी मेहता, अजित शहा यांनी सहयोग दिला आहे.

हा सोहळा मोडनिंब येथे होत असल्याने येथील जैन श्रावक व श्राविका तसेच समाजाने या सोहळ्यात मोठा सहभाग नोंदविला आहे. मोडनिंब चे माजी उपसरपंच विशाल मेहता व त्यांचे सर्व कुटुंबीय ,पोपटलाल दोभाडा ,संजय मेहता,अरविंद गुरसाळकर ,सारंग शहा,राहुल गांधी, रत्नदीप मेहता ,राहुल शहा व संस्थेचे सर्व सदस्य, समाज धर्म प्रभावने साठी हातभार लावत आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com