esakal | "एसटी'चे चालक-वाहक अद्याप लसीकरणापासून वंचित !
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

"एसटी'चे चालक-वाहक अद्याप लसीकरणापासून वंचित !

sakal_logo
By
विजय थोरात

दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चालक- वाहकांना दररोज प्रवाशांच्या संपर्कात यावे लागते.

सोलापूर : अनलॉकनंतर एसटी महामंडळाची (Maharashtra State Transport Corporation) प्रवासी वाहतूक सेवादेखील पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चालक- वाहकांना दररोज प्रवाशांच्या संपर्कात यावे लागते. त्यामुळे त्यांचे लसीकरण (Vaccination) होणे अत्यावश्‍यक आहे. परंतु, आजवर सोलापूर आगारातील फक्त 300 चालक- वाहकांचे लसीकरण झाले आहे. उर्वरित कर्मचारी अद्याप लसीकरणाऱ्या प्रतीक्षेत आहेत. (Employees of ST bus Solapur division have not yet received the corona vaccine)

हेही वाचा: आता श्री विठ्ठलाचे चोवीस तास ऑनलाइन दर्शन !

कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट ओसरल्यानंतर एसटीची चाके पुन्हा भरधाव वेगाने धावू लागली आहेत. दररोज एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संपर्कात चालक- वाहकांना सातत्याने यावे लागते. महामंडळाने दोन ते तीन ठिकाणी लसीकरणाचे कॅम्प भरविले होते. या ठिकाणी अवघ्या 300 जणांचे लसीकरण झाले आहे. मात्र उर्वरित कर्मचारी हे मिळेल तेथे स्वतःहून लस घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चालक- वाहकांच्या लसीकरणासाठी महामंडळाने कोणत्याही प्रकारची नेटकी सुविधा केली नसल्याचे प्रवासी वाहतूक संघटनेकडून सांगण्यात आले. त्यामुळे चालक- वाहक लसीकरणापासून वंचितच राहिले आहेत.

हेही वाचा: आणि बनीराम पाटील झाला सखाराम कदम..!

सोलापूर आगारातील परिस्थिती

  • एकूण चालक-वाहक : 490

  • एकूण चालक : 245

  • एकूण वाहक : 245

  • 45 वर्षांपुढील कर्मचाऱ्यांचे लसीकरण : 250

राज्य परिवहन महामंडळाने लसीकरणाचे कॅम्प घेणे आवश्‍यक आहे; जेणेकरून सर्व चालक- वाहकांचे लसीकरण होईल. कारण, दररोज हजारो प्रवाशांशी त्यांचा संपर्क येत असतो.

- श्रीकांत शड्डू, विभागीय सचिव, इंटक, सोलापूर

loading image