Solapur : युरोपची नोकरी सोडून अभियंता दांपत्याने केले जिरेनियम सुगंधी तेलाचे उत्पादन

युरोपमधील नोकरी सोडून पंढरपूर येथील अभियंता तेजस गुराडे व हर्षाली लोकरे या अभियंता दांपत्याने जिरेनियम तेलाच्या उत्पादन घेतले आहे. भविष्यात उपउत्पादने व निर्यातासाठी त्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे.
Solapur
Solapur sakal

सोलापूर: युरोपमधील नोकरी सोडून पंढरपूर येथील अभियंता तेजस गुराडे व हर्षाली लोकरे या अभियंता दांपत्याने जिरेनियम तेलाच्या उत्पादन घेतले आहे. भविष्यात उपउत्पादने व निर्यातासाठी त्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे. पंढरपूर येथील अभियंता तेजस गुराडे हे मेकॅनिकल अभियंता आहेत. शिक्षण संपल्यानंतर तेजस यांनी युरोपमध्ये एमएस शिक्षण घेतले. त्यांनी सप्लाय चेन मॅनेजमेंट ॲंड लॉजिस्टीक्स या विषयात त्यांनी हे शिक्षण घेतले. त्यानंतर युरोपातील नोकरी सोडून ते भारतात परतले.

तेव्हा काही स्वतःचे उत्पादन तयार करावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. जिरेनियम ऑईल तयार करण्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली. त्यासाठी त्यांनी जिरेनियम तेल खरेदीदारासोबत खरेदी करार केला. त्यांनी जमीन भाड्याने घेऊन कामास सुरवात केली. कोणतेही रासायनिक खत न वापरता नैसर्गिक पध्दतीने त्यांनी उत्पादन घेण्याचे ठरवले. बाजारात जिरेनियमची रोपे महाग असल्याने त्यांनी वेगळ्या पध्दतीने या खर्चात बचत करण्याचे ठरवले. त्यांनी रोपांच्या ऐवजी कंद किंवा स्टीक लावणारा शेतकऱ्याचा शोध घेतला. तेव्हा त्यांना कमी किमंतीत या स्टीक मिळाल्या.

नंतर त्यांनी उत्पादन हाती येईपर्यंत तेलाचा स्वतःचा प्लांट उभा केला. पहिल्यांदा उत्पादन हाती आल्यानंतर त्याचे थेट तेलात रुपांतर करण्यात ते यशस्वी झाले. आता त्यांनी या उत्पादनामध्ये एक लिटर तेलासोबत १०० लिटर सुगंधी जलाचा उपयोग करण्याचे ठरवले. या पाण्याला गुलाब जल असे म्हटले जाते. लवकरच त्यांनी त्यांचे उत्पादन निर्यात करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे.

ठळक बाबी

  • - युरोपची नोकरी सोडून भारतात स्वतःचे उत्पादन

  • - जिरेनियम तेलाचे उत्पादन

  • - कमी खर्चात उत्पादन घेण्याचा प्रयत्न

  • - जिरेनियम तेलाच्या अर्थकारणात नव्या मार्गांचा अवलंब

  • - लवकरच तेलाची निर्यात सुरु होणार

  • - मिटकॉनचे अधिकारी चंद्रकांत लोंढे यांचे मार्गदर्शन

  • - मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून कर्ज मंजूर

Solapur
Solapur News : धक्कादायक ! महाविद्यालयीन तरुणीने संपविले जीवन

स्टार्टअपमधून विकसित केलेली मूल्ये

  • - कमी खर्चात उत्पादनासाठीच्या संकल्पनाचा उपयोग

  • - कमी खर्चामुळे बाजारभावाचा फटका सहन करण्याची क्षमतेची निर्मिती

  • - अन्य उपउत्पादनांची निर्मितीचा विचार

आम्ही जिरेनियम तेलाचे उत्पादन सुरू केले आहे. लवकरच त्याची निर्यात करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. या शिवाय अन्य उत्पादने देखील बाजारात आणण्याचे नियोजन केले आहे.

- तेजस गुराडे, होळेगाव, ता. पंढरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com