esakal | 'उजनी' रेंगाळतेय 60-62 टक्‍क्‍यांवरच ! तीन जिल्ह्यांना लागली धाकधूक
sakal

बोलून बातमी शोधा

'उजनी' रेंगाळतेय 60-62 टक्‍क्‍यांवरच ! तीन जिल्ह्यांना लागली धाकधूक

गेल्या दीड-दोन महिन्यापासून उजनी जलाशयासह पुणे जिल्हा तसेच भीमा खोरे परिसरात पावसाने मोठा ब्रेक घेतल्याने उजनी धरणाचा पाणीसाठा 60 ते 62 टक्‍क्‍यांदरम्यानच रेंगाळत आहे.

'उजनी' रेंगाळतेय 60-62 टक्‍क्‍यांवरच! तीन जिल्ह्यांना लागली धाकधूक

sakal_logo
By
राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

केत्तूर (सोलापूर) : उपयुक्त पाणीसाठ्याच्या बाबतीत जायकवाडी (Jaikwadi Dam) व कोयना धरणानंतर (Koyna Dam) उजनी धरण (UJani Dam) हे सर्वांत मोठे धरण आहे. उजनी धरणाचा मृतसाठा 63.65 टीएमसी असून, गेल्या दीड-दोन महिन्यापासून उजनी जलाशयासह पुणे जिल्हा (Pune) तसेच भीमा खोरे परिसरात पावसाने मोठा ब्रेक घेतल्याने उजनी धरणाचा पाणीसाठा 60 ते 62 टक्‍क्‍यांदरम्यानच रेंगाळत आहे. त्यामुळे सोलापूर (Solapur), पुणे, नगर (Nagar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

हेही वाचा: राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेचा 'या' दिवशी निकाल! 2019 चा निकाल लांबला

गतवर्षी उन्हाळ्यामध्ये उजनी जलाशयाचा पाणीसाठा मायनस 23 टक्‍क्‍यांवर गेला होता. परंतु, पावसाळा सुरू झाल्यानंतर तो मायनसमधून प्लसमध्ये म्हणजे 62 टक्‍क्‍यांवर गेला. मात्र, यामध्ये वाढ होण्याऐवजी त्यात घट होत आहे. सध्या पाणीसाठा 60 टक्‍क्‍यांवर स्थिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये उजनीचा पाणीसाठा 100 टक्के होत होता. परंतु, यावर्षी मात्र पुणे जिल्हा परिसर व भीमा खोऱ्यात तसेच उजनी धरण परिसरात पावसाने मोठा ब्रेक घेतल्याने तो सध्या 60 टक्‍क्‍यांवरच स्थिरावला आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस फारच थोडे राहिल्याने उजनी धरण 100 टक्के भरणार की नाही, याची चिंता सर्वांनाच लागली आहे.

हेही वाचा: आता बोलबाला पर्यावरणपूरक 'गोमय गणेश मूर्ती'चा !

गेली तीन वर्षे ऑगस्टमध्ये उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत होते. मात्र यावर्षी पावसाने ब्रेक घेतल्याने व जलाशयात दाखल होणाऱ्या पाण्याचा वेग अत्यंत कमी असल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी घट होताना दिसत आहे. सध्या उजनी धरणावरील सर्व धरणे भरले आहेत, तर काही भरण्याच्या स्थितीत आहेत. येथे दमदार पाऊस झाल्यास हे सर्व अतिरिक्त पाणी उजनी जलाशयात येणार आहे. परंतु तेथेही पावसाने ब्रेक घेतला आहे. सध्या पाऊस होत असला तरी तो अत्यंत कमी आहे. सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर नाही. त्यामुळे उजनी धरणातून कालवा, बोगदा तसेच इतर माध्यमातून पाणी सोडले गेले आहे. जलाशयातून सोलापूरला पिण्यासाठी म्हणून सुमारे 20 ते 25 टीएमसी पाणी सोडणे गरजेचे असते. जर धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही तर सोलापूरसह नगर आणि पुणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना तसेच तसेच औद्योगिकरण व शेतीला मोठा फटका बसणार आहे.

उजनीची सद्य:स्थिती

  • पूर्ण संचय पाणीसाठा : 486.83

  • अचल पाणीसाठा : 1517=19 दलघमी

  • उपयुक्त पाणीसाठा : 1802.81 दलघमी

  • पाणी पातळी : 494.895 मीटर

  • एकूण पाणीसाठा : 2721.67 दलघमी

  • टक्केवारी - 60.56 टक्के

loading image
go to top