esakal | Solapur : तत्कालीन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदेंचा 'हा' विचार सर्वांनाच भावला
sakal

बोलून बातमी शोधा

तत्कालीन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदेंचा 'हा' विचार सर्वांनाच भावला

साधारण व्यक्‍तींसाठी काम करण्याचा प्रामाणिक हेतू ठेवल्यास लोक पोलिसांना डोक्‍यावर घेतील, असा विश्‍वास तत्कालीन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी व्यक्‍त केला.

तत्कालीन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदेंचा 'हा' विचार सर्वांनाच भावला

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : वाइटांना घाबरायला लावणारी आणि सर्वसामान्यांना मैत्री वाटणाऱ्या पोलिसिंगची गरज आहे. साधारण व्यक्‍तींसाठी काम करण्याचा प्रामाणिक हेतू ठेवल्यास लोक पोलिसांना (Police) डोक्‍यावर घेतील, असा विश्‍वास तत्कालीन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी व्यक्‍त केला. कोरोना (Covid-19) काळात प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) करताना पत्रे, लाकडी बांबू लावून रस्ते बंद करण्याचा त्यांचा पॅटर्न राज्यभर पोचला. सर्वसामान्यांसाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड सर्वांनाच भावली.

हेही वाचा: पवारांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला धक्का! सुशीलकुमार शिंदे म्हणाले...

पोलिस आयुक्‍तालयातर्फे अंकुश शिंदे यांना सोमवारी निरोप देण्यात आला. विशेष पोलिस महानिरीक्षक सुधार सेवा या ठिकाणी शिंदे यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांच्या निरोपाचा कार्यक्रम आयुक्‍तालयात पार पडला. त्या वेळी शिंदे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनाचे धडे दिले. या वेळी पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर, पोलिस आयुक्‍त बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्‍त डॉ. प्रीती टिपरे, सहाय्यक पोलिस आयुक्त माधव रेड्डी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांगर यांनी केले.

तत्कालीन पोलिस आयुक्‍त शिंदे म्हणाले, सर्वसामान्य व्यक्‍ती निर्धास्त राहावी, यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत. चांगल्या पोलिसिंगच्या माध्यमातून सोलापूर शहराचे नाव उज्ज्वल होईल. सोलापूर शहरातील तरुणांमध्ये वैविध्यता असून त्यांच्याकडील तांत्रिक ज्ञानाचा वापर योग्य ठिकाणी झाल्यास निश्‍चितपणे शहराची विकासाकडे वाटचाल होईल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्‍त केला. दरम्यान, या वेळी उपायुक्‍त डॉ. धाटे, डॉ. कडूकर, सहाय्यक पोलिस आयुक्‍तांसह विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार, सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्‍विनी भोसले, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी मनोगते व्यक्‍त केली.

हेही वाचा: उजनी जलाशयाच्या प्रदूषणात भर घालतेय जलपर्णी !

अंकुश शिंदेंचा 'हा' विचार सर्वांनाच भावला

कोणत्याही व्यक्‍तीची उंची ही त्याचा आचार, विचार व उच्चारावरून मोजली जाते. सर्वसामान्यांसाठी काम करून त्यांना न्याय देणाऱ्यांच्या पाठीशी पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे हे नेहमीच ठाम उभे राहिले. "तुमच्या असण्याचा सर्वसामान्यांना आधार वाटायला हवा, तो आधार त्यांना मिळाला तरच तुम्ही असण्याचा उपायोग आहे' हा विचार शिंदे यांनी दिला. त्याचा उल्लेख सर्वच अधिकाऱ्यांनी त्यांच्या भाषणातून केला. दरम्यान, अधिकाऱ्यांनी अंकुश शिंदे यांना वाहनातून निरोप देण्याचे नियोजन केले होते, परंतु त्यांनी तो समारंभ नाकाराला.

loading image
go to top