
सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खोटे सोने ठेऊन कर्ज घेतल्याप्रकरणी जिल्हा बँकेतील सहा शाखाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. खोटे सोने ठेऊन कर्ज घेतल्याच्या प्रकरणात बँकेची जवळपास २७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे. शाखाधिकाऱ्यांनी बँकेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खोट्या सोन्याच्या प्रकरणात संबंधित सोनार आणि कर्जदार यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची तयारी बँकेने केली असल्याचे समजते.