
Police uncover land fraud in Ambejogai-Tamalwadi area; fake Gram Panchayat extract used in property sale.
Sakal
सोलापूर : तक्रारी अर्जानंतर पडताळणी झाली आणि अंबेजोगाई (जि. बीड) व तामलवाडी (जि. धाराशिव) येथील दोघांनी होनसळ (ता. उत्तर सोलापूर) ग्रामपंचायतीकडून नमुना क्र. आठ व बोगस दाखला घेऊन सोलापूर उत्तरच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी दिली. या प्रकरणी दोघांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.