
Agitated farmers protest outside the former State Home Minister’s residence in Solapur, demanding payment of ₹5 crore pending for two years.
Sakal
उ. सोलापूर : थकीत ऊसबिलासाठी शेतकऱ्यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. म्हेत्रे यांच्याशी संबंधित असणाऱ्या मातोश्री शुगर या साखर कारखान्याने गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या उसाची जवळपास पाच कोटींची रक्कम थकवली आहे. या वर्षीही गाळप परवाना नसताना उसाचे गाळप करून शेतकऱ्यांची रक्कम थकवली आहे.