

Call for Honest Leadership in Sugar Sector; Protesters Support Tukaram Mundhe
esakal
-किरण चव्हाण, माढा
माढा: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी माढ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीसाठी माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे चर्चेत असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या कार्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून अनोखे आंदोलन करण्यात आले.