esakal | Solapur : शेतकऱ्यांनो, ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अर्ज करा! 40 टक्के अनुदान
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांनो, ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अर्ज करा! 40 टक्के अनुदान

ड्रॅगन फ्रूट कमलकन हे एक निवडुंग जातीतील औषधी गुण, पोषकद्रव्ये असलेले फळ आहे.

शेतकऱ्यांनो, ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अर्ज करा! 40 टक्के अनुदान

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ड्रॅगन फ्रूट कमलकन (Dragon Fruit) हे एक निवडुंग जातीतील औषधी गुण, पोषकद्रव्ये असलेले फळ आहे. 2021-22 या वर्षापासून कृषी विभागाकडून (Department of Agriculture) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान देण्यात येत आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे (Balasaheb Shinde) यांनी केले आहे.

ड्रॅगन फ्रूट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्त्वे आणि ऍन्टी ऑक्‍सिडन्टमुळे या फळास सुपर फ्रूट म्हणूनही प्रसिद्धी मिळत आहे. या फळात विविध औषधी गुण, फॉस्फरस, कॅल्शियम अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. या फळाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून, पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.

हेही वाचा: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उसाचा झाला पत्रा! ऊस गळीत हंगाम लांबणार?

भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी अनुदान देय आहे. प्रती हेक्‍टर चार लाख रुपये प्रकल्प मूल्य ग्राह्य धरून 40 टक्‍क्‍यांप्रमाणे एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्‍टर अनुदान तीन वर्षात 60 : 20 : 20 या प्रमाणात देण्यात येते. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

loading image
go to top