
"Madha Taluka rocked by education fraud — headmaster accused of cheating teacher with fake documents."
Sakal
टेंभुर्णी : खासगी विना अनुदानित शाळेवर एकही दिवस न आलेल्या शिक्षकाच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांचा गैरवापर करून खोटे हिशोब बनवून व बनावट स्वाक्षरी करून सुमारे साडेतीन लाख रुपये हडप केल्याप्रकरणी आलेगाव खुर्द (ता. माढा) येथील सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केचे यांना टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली. माढा न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत (ता. १०) पोलिस कोठडी सुनावली आहे.