

Mumbai Sees Sharp Hike in Ticket Rates; Goa Routes Also Get Costlier
sakal
सोलापूर :डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात विमानसेवेस मिळणारा प्रतिसाद पाहता तिकिटाच्या दरातही वाढ झाली आहे. मुंबईसाठी कंपनीने ३५०० रुपये दर असताना प्रत्यक्षात ४ हजार रुपये मोजावे लागत आहेत. गोव्यासाठीही २ हजार तिकिट असताना २५०० ते ३५०० रुपयांपर्यंत तिकिट दर पोचले आहेत. पुढील तीन महिने गोव्यासाठी ९८ टक्के तर मुंबईसाठी ४० ते ६० टक्के बुकिंग झाले आहे. दोन्ही शहरासाठी नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता जानेवारी महिन्यात आणखी तिकिट दर वाढण्याचा अंदाज आहे.