Solapur News : आग लागल्याची माहिती कारखाना कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाच्या मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला व लोकमंगल शुगर, भंडारकवठे येथील अधिकाऱ्यांना संपर्क साधून अग्निशामक यंत्रणा बोलावून घेतली व लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.
Fire at Avatade Sugar Factory destroys 5000 tons of bagasse, causing significant financial loss.Sakal
मंगळवेढा : तालुक्यातील नंदूर येथील आवताडे शुगरच्या बगॅसला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून अंदाजे ५००० मेट्रिक टन लूज बगॅस जळाला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. या आगीमध्ये सुमारे २ कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे.