सोलापूर: तब्बल पाच दिवसांनी तरुणाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला!

उपळाई ठोंगे येथील घटना
solapur
solapursakal

बार्शी : उपळाई ठोंगे (ता. बार्शी) येथील 18 डिसेंबर रोजी घरातून बाहेर पडलेला तरुण तब्बल पाच दिवसांनी गावातील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला असून त्याच्या कमरेभोवती गमजामध्ये दगड बांधलेला आढळला आहे आत्महत्या किं घातपात याबाबत बार्शी तालुका पोलिसांनी मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी कुटुंबाने केली आहे.मंगेश मुसळे (वय 30, रा. उपळाई ठोंगे) असे मृत तरुणाचे नाव आहे त्याचे वडील कालिदास मुसळे यांनी पोलिसांत अर्ज दाखल केला असून ही घटना 23 डिसेंबर रोजी सकाळी दहाच्या दरम्यान उघडकीस आली.(Five days later the body of a young man was found floating in a well)

solapur
सांगली : हळदीचा रंग होणार बेरंग?

कालिदास मुसळे यांनी तालुका पोलिसांकडे दिलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की,पत्नी,मुलगा मंगेश आम्ही 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान जेवण करु असे म्हणताच मंगेश गावातून जाऊन येतो,परत जेवण करु असे म्हणून निघून गेला.त्यादिवशी पासून मंगेश घरी परतला नाही गावात, नातेवाईकांकडे चौकशी केली पण त्याची काहींही माहिती मिळाली नाही.23 डिसेंबर रोजी भाऊ बाबासाहेब मुसळे शेतात जात असताना गावातील हैबत सदावर्ते यांच्या विहिरीमध्ये मृतदेह तरंगत असल्याचे उघडकीस आले.ग्रामस्थ,पोलिस यांनी मृतदेह पाहिला असता मृतदेहाच्या कमरेला गमजामध्ये दगड बांधला होता तो कापून विहिरीतून वर काढण्यात आला त्यावेळी मंगेशचाच मृतदेह असल्याचे समजले.आत्महत्या केली किं घातपात झाला असा संशय कुटुंबामध्ये निर्माण झाला असून मंगेशच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे तपास हवालदार एच.डी.वाघमोडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com